एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एक धक्का; आता जालन्यातील मोठा नेता फोडत पालिका, झेडपीचे रणशिंग फुंकले

  • Written By: Published:
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एक धक्का; आता जालन्यातील मोठा नेता फोडत पालिका, झेडपीचे रणशिंग फुंकले

Eknath Shinde Jalna meeting: विधानसभा निवडणुकीनंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये (Shivsena) इनकमिंग वाढले आहे. स्थानिक पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्याबरोबर येत आहे. मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत आहे. आता जालना जिल्हाध्यक्ष आसाराम बोराडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेला (uddhav Thackeray) रामराम ठोकला आहे. त्यांनी जालना येथील सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्याचबरोबर काँग्रेसचाही काही जणांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय.

Jarange Exclusive : एकीकडे आंदोलनाचे शस्त्र तर, दुसरीकडे फडणवीसांवर बोलताना नरमाईची सूर

शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आभार यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात शनिवारी जालन्यापासून करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाचही मतदार संघांवर महायुतीचा विजय झाला आहे. याप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महानगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अजितदादांनी डावललं, फडणवीस-शाहंनी गोंजारलं… भुजबळांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ आलाय?

शिंदे म्हणाले की, मुंबई, ठाण्यामध्ये मराठवाड्यात बाळासाहेबांचे विचार रुजले. येथील जनतेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. या विधानसभा निवडणूक निकालाने शिवसेना आणि चिन्ह कोणाचे यावर शिक्कामोर्तब केले आहे. घरात बसून निवडणुका लढता येत नसतात, त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. कार्यकर्ते यांच्यात मिसळावे लागते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेत कोणी नोकर नाही आणि कोणी मालक नाही. शिवसेनेत सर्वजण कार्यकर्ते आहेत. म्हणनूच सामान्य कार्यकर्ते यांना आतापर्यंत न्याय देण्यात आला आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळेलपर्यंत काम करतच राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

यावेळी उबाठाचे जिल्हाप्रमुख आसाराम बाेराडे, काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, शुभम राऊत यांच्यासह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आसाराम बोराडे यांना परतूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतरही त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, खासदार संदीपान भुमरे, आमदार अर्जुनराव खोतकर, आ. हिकमत उढाण, आ. शशिकांत खेडेकर, प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, जंजाळ, अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube