रेल्वेतील गोळीबार धार्मिक हिंसेतून नाहीतर, आरोपीने.., सरकारी सुत्रांनी केला दावा…

जयपूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमध्ये झालेल्या गोळीबारात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतन सिंगला RPF जवानांनी मोठ्या शिताफिने अटक केलं होतं. त्यानंतर आरोपी चेतन सिंगची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये चेतन सिंगने मोठा खुलासा केला आहे. याबाबत विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान आरोपी […]

Mumbai Express Firing

Mumbai Express Firing

जयपूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमध्ये झालेल्या गोळीबारात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतन सिंगला RPF जवानांनी मोठ्या शिताफिने अटक केलं होतं. त्यानंतर आरोपी चेतन सिंगची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये चेतन सिंगने मोठा खुलासा केला आहे. याबाबत विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे.

संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान

आरोपी चेतन सिंगने सांगितलं की, जयपूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमध्ये घडलेल्या गोळीबारामागे कोणतीही जातीय किंवा धार्मिक हिंसेची पार्श्वभूमी नसल्याचा दावा सरकारी सुत्रांनी केला आहे. गोळीबारानंतर एएसआयसह 4 जणांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याला मानसिक आरोग्य तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : स्टेट्स ठेवत पतीने घेतला गळफास… मृत्यूचे कारण ऐकून व्हाल हैराण

या घटनेनंतर आरोपी चेतन सिंगची मानसिक तपासणी केली जात आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि पोस्टमधून उफाळत असलेला धार्मिक हिंसेचा मुद्दा रेल्वे मंत्रालयाच्या सुत्रांकडून नाकारण्यात आला आहे. कारण आरोपीने गोळीबारामध्ये हिंदुंवरही गोळ्या झाडल्या आहेत.

नेमकं काय घडलं होतं?
राजस्थानमधील जयपूरहुन मुंबईकडे सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे येत होती. एक्सप्रेस रेल्वे मुंबईतील मीरा रोडजवळ पोहचताच RPF चे जवान चेतन सिंग यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये एका जवानासह 3 जणांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं. त्यानंतर गोळीबारामध्ये आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी सुरक्षा चेन खेचली. त्याचवेळी आरोपी चेतन सिंगने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मीरा रोडजवळील रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर RPF जवानांसह पोलिसांनी चेतन सिंगला मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

Exit mobile version