संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान

संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान

सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या मिशाच नव्हे तर पायही कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान सोलापुरातील एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. भिडे यांची पोलिस सुरक्षा काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, मग त्यांचे जे करायचं ते आम्ही करू, असेही जहाल विधान करण्यात आले आहे. (AIMIM leader on sambhaji bhide A reward of two lakhs will be given to the one who cuts the feet of Bhinde)

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांनी हे सातत्याने महापुरूषांवर टीका करत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळं संपूर्ण राज्यात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. ठीक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. त्यानंतर कालली त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांच्या अटकेची मागणी होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भिडेंच्या मिशा कापणाऱ्याला एका लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तर अशातच आता एआयएमआयएमने त्यात आणखी भर टाकली आहे.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये… 

आज सोलापूरात एआयएमआयएम पक्षाच्या वतीने रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे शहर सरचिटणीस कोमारे सय्यद, युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर, मच्छिंद्र लोकेकर, माजी नगरसेविका वहिदबानो भंडाले आदी सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना संभाजी भिडे यांच्यासह राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. भिडे हे सातत्याने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करत आहेत. ते भारतीय तिरंगा ध्वजाचाही अपमान करतात. त्यांचं हे त्याचे देशद्रोही कृत्य आहे. मात्र भाजप सरकारने कारवाई न करता त्यांना मोकळे सोडल्यानेच भिडे यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यांची मिशी कापून आणण्यासाठीच नव्हे तर त्यांचे पाय देखील कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असं वक्तव्य एआयएमआयएमचे युवा शहराध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केले. तर मच्छिंद्र लोकेकर यांनी मोठी अद्दल घडवण्याची भाषा केलाी. शासनाने भिडे यांचे पोलीस सुरक्षा काढून त्यांना फक्त पाच मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्यावे. त्यांचे जे करायचे ते आम्ही करू, असे विधान त्यांनी केले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube