प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी:
मुंबई (BMC) महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तब्बल दहा कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. पण आता सूरज चव्हाण प्रकरणात विरोधकांनी ठाकरे कुटुंबाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यात येत आहे. याबाबतचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे सध्या सूरज चव्हाणची चर्चा सुरू झाली आहे. सूरज चव्हाण नेमकी कोण आहे हे जाणून घेऊया…(ubt-sena-suraj-chavan-ed-raid)
बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
सूरज चव्हाण हे मूळचे शिवसैनिक आहेत. भायखळा शाखेत असल्यापासून ते शिवसेनेचे काम करतात. भायखळा शाखेत असताना त्यांची शिवसेना भवन येथे अनेकांशी संबंध आला. त्यातून अनेकांशी त्यांची मैत्री झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचे देतील ते खास समजले जातात. त्यामुळेच शिवसेना भवन मध्ये सूरज चव्हाण यांचा दबदबा निर्माण झाला. गेले अनेक दिवस अनिल देसाई यांच्यासोबत काम केल्यानंतर चव्हाण यांनी युवा सेनेत काम सुरू केले. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या जवळ ते गेले. आदित्य ठाकरे यांच्या बैठका नियोजन करणे, प्रेसनोट, तसेच आदित्य ठाकरे यांच्या दौराचे नियोजन याची व्यवस्था करण्याचे काम सूरज चव्हाण हे पाहत होते.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा रुबाब त्यावेळी मंत्रालयात प्रत्येकाने पाहिला आहे.
बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…
सहाव्या मजल्यावर सूरज चव्हाण यांची वर्दळ ही त्याकाळी चर्चेचा विषय होता. विशेषता अनेक मंत्री आमदार यांच्यापेक्षा सूरज चव्हाण यांना सर्व सचिवांकडे सहज वावर होता. हे सर्वांनी अनुभवले आहे. काही अधिकारी व सूरज चव्हाण यांची असलेली मैत्री कुतुहलाचा विषय होती. पण सूरज चव्हाण यांची ईमेज मीडियाच्या चर्चेत कधीच राहिली नाही. सरकार येण्यापूर्वी आणि सरकार असताना सूरज चव्हाण यांच्यात झालेला आमूलाग्र बदल नक्कीच नजरेत भरणारा होता.
सूरज चव्हाण सत्तेत असताना नव्हे तर आता चर्चेच्या केंद्रबिंदू ठरले आहे. कोविडकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे? या चौकशीत आणखी काही जण अडचणीत येतात का ? हे ईडीच्या तपासात समोर येईल. पण सध्या तर सूरज चव्हाण प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याची संधी सत्ताधाऱ्यांनी मिळाली आहे हे नक्की.