Uday Samant : ठाकरेंच्या व्यासपीठावरचे काही दिवसांत शिंदेंचे नेतृत्व स्विकारतील; सामंतांचा दावा

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray ) सभेवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेमके कोणते नेते शिंदे गटात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाटकी लोकांना किंमत […]

Uday Samant

Uday Samant

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray ) सभेवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेमके कोणते नेते शिंदे गटात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा…अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या रस्त्यावरच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला जास्त गर्दी असते. पक्षप्रमुखापेक्षा जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहा पट गर्दी असते. अशा कितीही सभा झाल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील.

चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला; ठाकरेंची शिंदे गटासह भाजपवर जळजळीत टीका

पक्षप्रमुखांची शिवाजी पार्कला सभा व्हायची ती सभा आता रस्त्यावर येऊन घ्यावी लागते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेला उत्तर देण्यापेक्षा जनता उत्तर देईल. स्वतःचा कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी, हसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना हे करावे लागते आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात कुठेही चौकशी लावावी.

मी बोलत नाही संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही असे समजू नये. शिवाजी पार्कला सभा घेणारे रस्त्यावर आले आहेत. रस्त्यावर बोळामध्ये सभा घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. मी लाचारपणे त्यांच्याकडे गेलेलो नाही मला अडीच वर्षांपूर्वी त्यांनी बोलावले त्यांनी शपथ घेऊन सांगावे. उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा. असं म्हणत सामंतांनी ठाकरेंवर टीका केली.

Exit mobile version