Uddhav Thackeray : ‘ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांनीच मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती काढतो. सत्तेचा माज आलेल्यांवर आता बुलडोझर फिरवू. बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठीच आलो. सरकारने आमच्या जागेवर अतिक्रमण केलंय. तिथं ठेवलेला खोका फेकून द्या नाहीतर आम्ही फेकून देऊ. शिवसेनेची शाखा त्याच जागेवर भरणार मग पाहू या कोण आडवं येतंय. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवा अन् या भिडा आम्हाला’, अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला ललकारलं. मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर आगपाखड केली.
Uddhav Thackeray : ‘देशाची अखंडता धोक्यात राज्यकर्ते मात्र निवडणूक प्रचारात’ ठाकरे गटाची जळजळीत टीका
गद्दारांचं डिपॉझिट जप्त करून घरी पाठवा
ठाकरे पुढे म्हणाले, ‘खरा बुलडोझर काय असतो ते दाखवायला आलो. आमच्या जागेवर सरकारने अतिक्रमण केलं आहे. शिवसेनेची शाखा येथेच भरणार. पाहू कोण आडवं येतं. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवा अन् या भिडा आम्हाला. आमच्या शाखेपाशी ठेवलेला खोका उचला नाहीतर आम्ही फेकून देऊ. आता तुम्हीच निश्चय करा निवडणूक कोणतीही असो या निवडणुकीत गद्दारांचं डिपॉझिट जप्त करा आणि त्यांना घरी पाठवा. हे आता काही दिवसांचे पाहुणे. या नेभळटांना कुणी थारा देऊ नका. मी लढायला तयार आहे त्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे.’
मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेऊन भिडा
‘पोलिसांचे धन्यवाद मानतो कारण, त्यांना शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज इथं काही घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच राज्याची अब्रू घालवली आहे. दिल्लीच्या कृपेने आज तुम्ही सत्तेवर बसला आहात. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेऊन भिडा. आमची तयारी आहे. केसाला जरी धक्का लागला तर यांचे केस महाराष्ट्र उपटल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray : ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं पण, शरद पवार’.. उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा