Download App

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवक एम के मढवींना अटक

Uddhav Thackeray एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना त्यातच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery ) यांना मोठा धक्का बसलाय.

Uddhav Thackery Group M K Madhavi Arrested : एकीकडे लोकसभा निवडणुकांची ( Lok Sabha Election ) रणधुमाळी सुरू असताना त्यातच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना मोठा धक्का बसलाय. कारण उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी ( M K Madhavi ) यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आले आहे.

ध्क्केवर धक्के बसल्यावर फडणवीस ॲक्शन मोडवर, काँग्रेसचा मोठा नेता फोडणार ?

नेमकं प्रकरण काय?

एका ठेकेदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ठाकरे गटाचे एम के मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐरोलीतील ते माजी नगरसेवक असून याच ठिकाणच्या कार्यालयातून मढवी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना ठाण्यामध्ये नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मोठा धक्का!

दरम्यान दुसरीकडे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुँबई ईडीने मोठी कारवाई केली असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मोठा झटका दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने बुधवारी (दि.24) राऊतांचे कौटुंबिक मित्र प्रविण राऊत यांची 73.62 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत पत्राचाळ घोटाळ्यात 116.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत ईडीने पालघर, दापोडी, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता जप्त केली आहे.

Lok Sabha Election : सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणार; सुनेत्रा पवारांचा शब्द

ईडीने आज कारवाई केलेले प्रविण राऊत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र असून, प्रविण यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. मात्र, हे पैसे 10 वर्षानंतर परत करण्यात आले. खात्यावर आलेले हे पैसे कर्ज रूपात घेतल्याचा दावा राऊतांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर ईडीने राऊतांच्या मालमत्तेवरदेखील कारवाई केली होती.

follow us

वेब स्टोरीज