धक्क्यावर धक्के बसल्यावर फडणवीस ॲक्शन मोडवर, काँग्रेसचा मोठा नेता फोडणार ?

धक्क्यावर धक्के बसल्यावर फडणवीस ॲक्शन मोडवर, काँग्रेसचा मोठा नेता फोडणार ?

Madha Lok Sabha : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा (Madha Lok Sabha) चर्चेत आले. या मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याने कधी काय होणार हे कोणालाच सांगता येत नाही. यातच उद्या 28 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (DhavalSinh Mohite Patil) यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, ही भेट धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहे. चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत.

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील ते उपस्थित नव्हते. यामुळे उद्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. याच बरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर असं झाले तर एकाच दिवशी महाविकास आघाडीला दोन धक्के लागू शकता. काही दिवसापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेने जप्तीची कारवाई केली होती.

पुणेकरांनो, मोदी घेणार सभा, निर्बंध लागू, नियम मोडणाऱ्यांवर कलम 188 नुसार होणार कारवाई

तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस 28 एप्रिल रोजी तीन जाहीर सभा घेणार आहे. माढा तालुक्यातील वाकाव, सांगोल्यात आणि अकलूजमध्ये देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube