पुणेकरांनो, मोदी घेणार सभा, निर्बंध लागू, नियम मोडणाऱ्यांवर कलम 188 नुसार होणार कारवाई

पुणेकरांनो, मोदी घेणार सभा, निर्बंध लागू, नियम मोडणाऱ्यांवर कलम 188 नुसार होणार कारवाई

Modi Sabha In Pune : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी पुणेमध्ये (Pune) जाहीर सभा आणि रोड शो घेणार आहे. आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ सभा घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

रेसकोर्स मैदानावर सोमवारी 29 एप्रिलला महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यामुळे पुण्यात 29 आणि 30 एप्रिल रोजी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुणे शहर आणि परिसरात 29 आणि 30 एप्रिल रोजी अवकाश उड्डाणावर निर्बंध असणार आहे.

मोदी यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यानिमित्त अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हॉट बलून सफारी, पॅराग्लायडिंग, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन या प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहे. याच बरोबर नियम मोडणाऱ्यांवर कलम 188 नुसार होणार कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहे.

मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स मैदानावर सोमवारी 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहे.

नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करते, मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

तर 30 एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube