नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करते, मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करते, मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

Modi Speech In Kolhapur : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आहे.

या सभेत मोदींनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या सभेत बोलताना मोदी म्हणाले, देशात दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर भाजपने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा या देशात गरिबांची सरकार येत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

या निवडणुकीत जेव्हा काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीला (India Alliance) कळले आपण विकासाच्या मुद्यावर भाजपचा सामना करू शकणार नाही तेव्हा त्यांनी प्रचारादरम्यान देश विरोधी मुद्यांना घेण्यास सुरुवात केल्याची टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर केली. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करणार, तसेच सीएए कायदा रद्द करणार असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडी 5 वर्षात देशाला 5 पंतप्रधान देणार असं देखील मोदी म्हणाले.

मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

तर या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले नाही. नकली शिवसेना काँग्रेससोबत मिळून हिंदुत्त्व विरोधी काम करत आहे जर आज बाळासाहेब असते तर त्यांना वाईट वाटले असते असा घणाघात मोदी यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube