मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर
Ujjwal Nikam :  मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.  विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपने यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना होणारा विरोध पाहता आता भाजपकडून या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील असून दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.
दोन दिवसापूर्वी काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामुळे महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. महायुतीकडून या मतदारसंघात यापूर्वी अनेक नावांची चर्चा होती मात्र आता महायुतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढलेले खटले
मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, मुंबई साखळी बाँबस्फोट खटला, कोपडी बलात्कार प्रकरण, गँगस्टर अबु सालेम प्रकरण, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण,  प्रमोद महाजन हत्या प्रकरण

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube