Video : मुंब्य्रात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांच्या मदतीशिवाय…’

Thane Politics : मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची (Shiv Sena) मध्यवर्ती शाखा गेल्या आठवड्यात शिंदे गटाने बुलडोझरने जमीनदोस्त केली. या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी चार वाजता मुंबईत येत आहेत. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे […]

करेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; व्हिडिओ शेअर करत आव्हाड म्हणाले, 'पोलिसांच्या मदतीशिवाय...'

Thane Politics

Thane Politics : मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची (Shiv Sena) मध्यवर्ती शाखा गेल्या आठवड्यात शिंदे गटाने बुलडोझरने जमीनदोस्त केली. या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी चार वाजता मुंबईत येत आहेत. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कोल्हापुरात शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटीलही घेणार त्याच दिवशी सभा 

जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाण्यापर्यंत बॅनर लावले होते. ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. याचा एक व्हिडिओ आव्हाड यांनी X अकाऊंटवर शेअर केला आहे.

आव्हाड यांनी लिहिलं की, मी स्वतः मुंब्रा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून, शिवेसना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील, अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यानी असे काही होणार नाही, आपण निश्चिंत राहा, आमची सर्वत्र नजर आहे, असं मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगिलतं होतं.

कोल्हापुरात शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटीलही घेणार त्याच दिवशी सभा 

आज उद्धव ठाकरेंचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने बॅनर शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के बॅनर आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आङेत. एक बॅनर फाडायला किमान १५ मिनिटे लागतात आणि सर्वत्र नजर असणाऱ्या पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, हे उद्धव साहेबांना आम्ही मुंब्य्रात येऊ देणार नाही..!, असं आव्हाडांनी सांगितलं.

असो, तरी देखील मी मुंब्रा पोलिस स्टेशन आणि ठाणे पोलिसांचे आभार मानतो. ते त्यांची ड्युटी मोठ्या निष्ठेने करत आहेत, असा टोला आव्हाडंनी लगावला. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो मंजुरे खुदा होता है, असंही आव्हाडांनी म्हटलं.

दरम्यान, दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडण्यात आल्यान शिंदे गट आण ठाकरे गटात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे

 

Exit mobile version