कोल्हापुरात दिवाळीनंतर फटाके; शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटलांचीही त्याच दिवशी सभा

  • Written By: Published:
कोल्हापुरात दिवाळीनंतर फटाके; शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटलांचीही त्याच दिवशी सभा

Sharad Pawar-Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवाही हजर होते. यासोबतच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, अजित पवारांनी एकत्रित हजेरी लावली होती. यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) आणि फडणवीस (Devendra Fadnavis) हे एका मंचावर येणार आहेत. पवार आणि फडणवीस पुढील आठवड्यात कोल्हापुरा एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.

पुण्यात जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात, कंटेनरच्या धडकेत दोघे जागीच ठार, ४ ते ५ जण गंभीर जखमी 

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळातर्फे 60 व्या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. या अधिवेशनाला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं. या दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यामुळं हे दोघेही नेते एकाच मंचावर येणार आहेत.

विशेष म्हणजे, याच दिवशी मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेले मनोज जरांगे पाटील हेही कोल्हापुरात येणार आहेत. जरागे-पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. दिवाळीनंतर जरांगे-पाटील १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात करणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वेग कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मागील दौऱ्यावेळी ज्या भागात जाणं झालं नाही, त्या ठिकाणी जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. 17 नोव्हेंबरला ते कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन ते कोल्हापूरात सभा घेणार आहेत.

Diwali Gold Purchase : दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा! सोनं खरं की खोटं असं ओळखा 

शाहू महाराजांनी घेतली होती जरांगेंची भेट
महाराष्ट्रातील आरक्षणाचा पाया राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घातला. त्याच नगरीत आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी जरांगे पाटील दौऱ्यावर येत आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी अंतरवली सराटीत जाऊन जरागेंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शाहू महाराजांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली असता जरागेंनी त्यांच्या विनंतीला मान देत पाण्याचा घोट घेतला होता.

दरम्यान, १७ ताऱखेला पवार आणि फडणवीस एकाच मंचावर असल्यानं हे नेते एकमेकांविषयी काय बोलतात, याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube