ड्रग्ज माफिया ललित पाटीलची नार्को टेस्ट करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी
Jitendra Awhad : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलंच गाजत आहे. यात राज्यमंत्र्यांचाही सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) हिंमत असेल तर मंत्र्याचे राजीनामे घ्या, असं चॅलेंज केलं. तर सरकारमधील मंत्र्यांनीही विरोधकांवर आरोप केले. या सगळ्या घडामोडीनंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली.
Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड
ललित पाटीलला अटक केल्यानंतर सध्या तो पोलीस कोठडीत आहेत. त्याने अनेक दावे केलेत. पोलिसांपासून जीवाला धोका आहे, आपण पळून गेलो नाही, तर पळवल्या गेलं, असे दावे त्याने केले. हे दावे खोटे असतील आपली नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्याने केला. दरम्यान, आज जितेंद्र आव्हाड यांनीही ललित पाटील याची नार्को टेस्ट करावीच. ड्रग्जला पाठीशी घालणारा कोणीही महाभाग महाराष्ट्रात नाही आहे. त्याची नार्को टेस्ट करा म्हणजे, चौकशीत सर्व समोर येईलच. सध्या तो पोलीस कोठडीत असूनही पोलीस त्याची नार्को टेस्ट का करत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
सुषमा अंधारेंनी ललित पाटील प्रकरणावरून सत्तेतील लोकांना लक्ष्य केलं. त्यामुळं भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांना धमकी दिली. यावरही आव्हाड यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, सुषमा अंधारे या स्पष्ट वक्त्या आहेत, त्यांना धमक्या आल्या तर त्या घाबरणाऱ्या नाहीत, कारण त्या चळवळीतल्या आहेत. परंतु एका महिलेला अशा धमक्या येत असतील तर संपूर्ण महाराष्ट्राची लाज जाते. एक महिला रडत असताना जर तिला पुरुष फोन करून धमक्या देत असतील, तर जिजाऊंच्या लेकीचं संरक्षण करणे हे महाराष्ट्राचे, महाराष्ट्र सरकारचे काम आहे ते महाराष्ट्र सरकारने करावे, अशा शब्दात त्यांनी ताशेरे ओढले.
मराठा आरक्षणावर बोलतांना नारायण राणेंनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण नको,अशी भूमिका घेतली. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावं या बाजूने मी आहे, त्यामुळे राणे काय म्हणाले आणि जरांगे काय म्हणाले यात मला इंटरेस्ट नाही. गरीब, कष्टकरी मराठ्यांना आरक्षण दिले गेलं पाहिजे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले, ज्याप्रमाणे दिल्लीचा कायदा सरकराने लोकसभेमध्ये जाऊन बदलून घेतला, ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेला इलेक्शन कमिशनचा कायदा सरकराने बदलला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्या कमिटीतून बाहेर काढले. तसेच 16% आरक्षण भाजपने लोकसभेत घेऊन जावं, त्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना लोकसभेच्या दारात घेऊन जावं. आम्ही महाराष्ट्राच्यावतीने मोदींच्या पाया पडून त्यांना आम्ही निवेदन देऊ की, आमचा जो मराठा समाज अत्यंत गरीब आहे, त्याला 16% आरक्षण द्या. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कायदे बदलता तर हा कायदा बदलायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला.