Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड

Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड

Sunny Leone Song: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Social media) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन आली आहे. सनीच्या “मेरा पिया घर आया 2.0” (Mera Piya Ghar Aaya) या नवीन गाण्याने सोशल मीडियावर (Social media) 15 दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या या गाण्याचा गूगला ट्रेंड असल्याचे दिसत आहे.

माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्याची सनी लिओनीने अनोखी झलक दाखवली आहे. या गाण्यात सनीचा रोमांचक परफॉर्मन्स बघायला मिळत आहे. खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. अखेर आज हे रोमांचक गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून “मेरा पिया घर आया” आहे, जे मूळत: 1995 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘याराना’ सिनेमात प्रदर्शित केले गेले होते. या गाण्याने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

हे नवीन गाण याराना (1995) मधील ‘मेरा पिया घर आया’ हा 1990 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय नृत्य क्रमांकांपैकी एक आहे. तिच्या अभिव्यक्तीपासून ते स्टेप्सपर्यंत माधुरीने या गाण्यात चांगलाच तडका लावला होता, आणि आपण नक्कीच तिच्यापासून नजर हटवू शकलो नाही. कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी गायलेले, अनु मलिक यांनी संगीत दिलेले आणि माया गोविंद यांनी लिहिलेले हे गाणे आहे. आणि आता हेच गाणे नवीन अंदाजात बघायला मिळत आहे.

Marathi Cine Award 2023: ‘या’ दिवशी रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’

या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. या गाण्याला अनू मलिकने संगीतबद्ध केले आहे तर गाण्याचे बोल माया गोविंद यांचे आहेत. तसेच हे गाणे नीती मोहनने गायले आहे. सध्या सर्वत्र गाण्याची चर्चा रंगली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube