Download App

फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय

उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.

Devendra Fadnavis Crirticize  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांची भाषा पाहता त्यांच मानसिक संतुलन बिघडल आहे असं दिसतय. त्यांना एका चांगल्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे. माझी विनंती आहे की उद्धव ठाकरेंनी उपचार घ्यावेत अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री शिंदे यांना दोन माकड म्हणून संबोधलं होत. त्यावर फडणवीसांनी वरील उत्तर दिलं आहे.

 

दानवेंना निवडून द्या, मराठवाडा दुष्काळमुक्त करू -फडणवीस

मी जास्त ओळखतो

सध्या उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून शरद पवा आहेत. त्यामुळे शरद पवार सांगतात तेच उद्धव ठाकरे बोलतात आणि करतात असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तसंच, उद्धव ठाकरे यांना अजित पवारांपेक्षा आपण जास्त चांगलं ओळखतो असंही फडणवसी यावेळी म्हणाले आहेत.

 

त्यामुळे ते बाहेर पडले

शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष विलीन करण्याबद्दल वक्तव्य केलं. त्यावर फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष उभा केला. परंतु, पुढे सर्व काही सुप्रिया सुळे यांना मिळणार आहे हे कळलं होत. त्यामुळे पुढे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले असंही फडणवीस म्हणाले.

 

Video : दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?; शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या वाघीणीला पिंजऱ्यात पकडलं

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी माकड आहेत, यांच्या हातात कोलीत सापडल आहे. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आता त्या दोन माकडांना सांगतो, बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. माझे वडील चोरून तुम्ही मत मागता, तुमच्या वडिलांची नावं सांगितलं तर कोण तुम्हाला दारातही उभं करणार नाही असा थेट प्रहार उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर केला होता.

follow us