Video : दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?; शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या वाघीणीला पिंजऱ्यात पकडलं

  • Written By: Published:
Video : दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?; शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या वाघीणीला पिंजऱ्यात पकडलं

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है’ असे लिहिले आहे, अशी जहरी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केली. त्यानंतर आता चतुर्वेदींच्या या टीकेला शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे. टीकेला उत्तर देताना म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना दावोच्या गुलाबी थंडीची आठवण करून देत त्यांना ‘चतुरताई’ असे संबोधले आहे. (Sheetal Mhatre On Priyanka Chaturvedi Davos Tour)

Video : मोदींसह महायुतीचं टेन्शन वाढलं; पवारांनी राज्याचा निकाल आकडेवारीसह सांगितला…

दावोसची गुलाबी थंडी आणि चतुरताई…

प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शीतल म्हात्रेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्या म्हणतात की, प्रिय चतुरताई,
तुम्ही खासदारकी कशी मिळवलीए हे खरंतर लोकांना सांगितलं पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना.. शिवसेनेचा संबंध नसतानाही आपण खासदारकी मिळवली.आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे. यावेळी म्हात्रे यांनी ‘बुलंदी’ मधला डायलॉग उच्चरला. यात त्या म्हणतात की, तुम्हाला माहिती नसेल.. बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुँह में हात डालने.. अशीच तुमची परिस्थिती झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नाशकातील ‘फायरब्रँड’ नेता तडीपार

दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलं ते सांगा?

व्हिडिओमध्ये बोलताना म्हात्रे यांनी काहीही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा. परत खासदारकी मिळावी, यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात? आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी खासदारकी द्या.. असं सांगणाऱ्या तुम्ही… त्यामुळे कुणाला बोलताय, याचा विचार करा आणि भान ठेवा असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube