Download App

‘…तरीही मी पुन्हा येईल’; उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा ‘चपरासी’ उल्लेख

मी चपरासी झालो तरीही चालेल पण मी पुन्हा येईन असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चपरासी असा उल्लेख केलायं.

Udhav Thackeray On Devendra Fadnvis : मी चपरासी झालो तरीही चालेल पण मी पुन्हा येईन असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा चपरासी असा उल्लेख केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमदेवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पाडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अमित शाहा, नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलीयं.

हंसल मेहता उघडणार नव्या घोटाळ्याची फाईल, ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ वेब सीरिजची केली घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा मुलाखत घ्यावी अन् विचारावं की टरबूज कसं खायचं? अक्षय कुमार यांनी 4 जूनच्या आधी मोदींची मुलाखत घ्यावी कारण टरबूजाचा भाव उतरणार आहे, आत्ता तर भाव नाहीच आहे पण मी चपरासी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईल असं फडणवीसांचं झालं असल्याची सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

Prerna Arora : महिलांचा समावेश असलेले चित्रपट का झाले पाहिजे? निर्मातीने सांगितलं या मागचं कारण

देशात भाजपचे फक्त दोनच खासदार होते, तेव्हा राजकारणात आपण अस्पृश्य होतो. तेव्हा कोणीच आपल्यासोबत यायला तयार नव्हतं. तेव्हा तुम्हाला शिवसेनेने साथ दिली आहे. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता, मोदी सरकार हे गजनी सरकार असल्याचंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

सावरकरांचे गाईबद्दलचे विचार वाचा :
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सावरकरांवर पाच ओळी बोलून दाखवाव्यात असं खुलं चॅलेंजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोमातेबद्दलचे विचार काय होते, हे जरा तपासून पाहा, वाचून घ्या, आम्ही आधी मातेचं रक्षण करुन नंतर गोमातेचं रक्षण करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावूनचं सांगितलं आहे.

मणिपूरमध्ये तुम्ही उलटे का झालात?
जो गोहत्या करेल त्याला उलटं टांगणार असल्याचं अमित शाहा म्हणाले आहेत. मागील दहा वर्षांपासून मोदींचीच सत्ता आहे, दहा वर्षे तुम्ही काय केलंत? मणिपूरमध्ये महिलांचे धिंडवडे काढण्यात आले तुम्ही तिथं का उलटे झाले? मणिपुरात तुमचं खाली डोकं वर आणि पाय खाली का झाले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलायं.

follow us