Thackeray Group Candiate List : आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलीयं. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असताना आता ठाकरे गटाची (Udhav Thackeray Group) थेट संभाव्य उमेदवारांची नावे माध्यमांच्या हाती आली आहेत. ठाकरे गटाचे मुंबईतील एकूण 22 संभाव्य उमेदवारांची नावे समोर आलीत. यामध्ये मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गटाने तयारी सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अद्याप जागावाटपाबाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्याआधीच ठाकरे गटाने आपले शिलेदार ठरवले आहेत. अद्याप जागावाटपाबाबत चर्चाच सुरु असून चर्चेआधीच संभाव्य उमेदवारांची नावे समोर आल्याने महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील जागावाटपावरुन संघर्ष अटळ असल्याचं दिसून येत आहे.
शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण! क्षमा तोच मागतो जो चुकतो; राहुल गांधींनी जखमेवर मीठ चोळलं
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांच्या गठबंधनाने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालंय. तर दुसरीकडे महायुतीनेही तिन्ही पक्षांच्या गठबंधनाने निवडणूक लढवली होती. आता ज्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले त्याच मतदारसंघांसह लोकसभेला आघाडी मिळालेल्या मतदारसंघातही ठाकरे गटाने हातपाय पसरल्याचं दिसून येत आहे. 2019 साली ठाकरे गटाने 14 जागा जिंकल्या होत्या, आता मुंबईतील एकूण 36 पैकी 22 जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडालीयं.
मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक
ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये मागाठाणेमधून तीन जणांची नावे चर्चेत आहेत, त्यात विलास पोतनीस, सुदेश पाटेकर, संजना घाडी, दहिसरमध्ये विनोद घोसाळकर, दिंडोशीमध्ये सुनिल प्रभू, जोगेश्वरीमध्ये अमोल किर्तीकर, शैलेश परब, अंधेरी पश्चिममध्ये ऋतुजा लटके, वर्सोवामध्ये राजू पेडणेकर, वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई, दादर माहिममधून विशाखा राऊत /महेश सावंत, शिवडीतून अजय चौधरी/सुधीर साळवी, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, भायखळ्यात किशोरी पेडणेकर/जामसुतकर/रहाटे, कांदीवलीत ईश्वर तायडे, चेंबूरमध्ये अनिल पाटणकर/प्रकाश फार्तेपेकर, भांडूपमध्ये रमेश कोरगांवकर, आणि विक्रोळीमध्ये सुनिल राऊत यांची नावे संभाव्य उमेदवारांमध्ये आहेत.
या संभाव्य उमेदवारांना तयारी लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील अनेक जागांवर काँग्रेसकडून दावा सांगितला जात आहे. ठाकरे गटाच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, मुंबईतील जागांवर निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचीही तयारी सुरु असून काँग्रेस नेते भाई जगताप, वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा करीत आहेत. पुढील 15 दिवसांत जागावाटपासंदर्भातील अनेक गोष्टी क्लिअर होणार असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलंय. तर ठाकरे गटाने दावा सांगितलेल्या जागांवर वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचं सावंतांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सर्वच पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. तर महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत प्राथिमक चर्चा सुरु आहे. आता ठाकरे गटाने 22 जागांवर दावा सांगितल्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.