Download App

Udhhav Thackeray यांचा शिंदे गटावर मोठा डाव; कीर्तीकरांच्या उत्तर पश्चिममध्ये मुलगा अमोलला उमेदवारी जाहीर

Udhhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी सध्या राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दरम्यान त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करत शिंदे गटावर पहिला डाव टाकलाय. या मतदारसंघात ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांचे उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे सध्या खासदार असलेले अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे गटात आहेत.

कोण तो रवींद्र चव्हाण? दापोलीत येऊन…; रामदास कदमांनी डागले पुन्हा टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातील जुहू येथे जनसंवाद सभेमध्ये या उमेदवारीची घोषणा केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला इकडे येण्याची गरज आहे. असं मला वाटत नाही. तसेच मी तुम्हाला उमेदवार देखील दिला आहे. त्यावर उपस्थितांनी अमोल कीर्तीकर यांच्या नावाचा एकच जल्लोष केला. तसेच ठाकरे म्हणाले की, ज्या मानसिक परिस्थिती तो जिद्दीने उभा राहिला त्यासाठी अमोलच कौतुक करतो. असं म्हणत ठाकरे यांनी ही उमेदवारी घोषित केली आणि शिवसैनिकांना त्यांच्या प्रचाराचं आवाहन केलं.

नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा, तोही पुरेना…; राऊतांची बोचरी टीका

तसेच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, अमोलच्या पाठीसुद्धा चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी सगळ्यांना सांगतोय सगळे दिवस सारखे नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागला आहात. पण उद्या येणार सरकार आमचा आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत. त्या सगळ्यांना मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

दुसरीकडे भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीतून मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात कोणता उमेदवार असणार हे अद्याप ठरलेले नाही. सध्या या ठिकाणी शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत त्यामुळे ही जागा जर शिंदे गटाला मिळाली तर या मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

follow us