Ulhasnagar Shivneri Hospital doctors declared living patient dead : दारात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पाहुणे मंडळी सगळी जमली…अन् प्रेत जिवंत उठून बसलं, अशी घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? तर उल्हासनगरमध्ये ही घटना (Ulhasnagar News) घडली आहे. डॉक्टरांनी थेट जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केलं. इतकंच नाही तर थेट डेथ सर्टिफिकेट दिलंय. हा कारनामा (Shivneri Hospital) केलाय. उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलने. घटना काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. 65 वर्षीय अभिमान तायडे यांना जिवंत असतानाच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यांचं डेथ सर्टिफिकेट देखील दिलं (doctors declared living patient dead) आहे. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्राच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अभिमान तायडे शुद्धीवर
उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला. ज्यात 65 वर्षीय अभिमान तायडे यांना जीवंत असूनही मृत घोषित केले गेले. त्यांना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले. पुढे कळाले की, त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असताना कुटुंबीयांना त्यांच्या छातीतील ठोके ऐकू आले. ताबडतोब ते दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे डॉक्टरांच्या उपचारांनी अभिमान तायडे शुद्धीवर आले.
पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं
रुग्णाची नस मिळाली नाही
शिवनेरी हॉस्पिटलचे डॉक्टर आहुजा यांनी मान्य केले की, रुग्णाची नस मिळाली नाही आणि परिसरात गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. त्यांनी चुकीने मृत घोषित केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. अभिमान तायडे यांनीही सांगितले की, त्यांना आता तब्येत ठीक असून त्यांनी जेवणही केले आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तपासणीवरील विश्वास किती ठेवायचा, असा प्रश्न पडत आहे. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरु केली असून, डॉक्टरांविरोधात काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू
रूग्णालयाचा निष्काळजीपणा
एका रूग्णालयाचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे. तायडे यांना कावीळ झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यावर उपचार सुरू होते. दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडल्याने सगळे घाबरून गेले. रूग्णालयात नेले असता, त्यांची नस न सापडल्याने डॉक्टरांनी त्यांना थेट मृतच घोषित केलंय. अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, परंतु नातेवाईकांना त्यांच्या छातीत काहीतरी धडधड होत असल्याचं जाणवलं. प्रसंगावधान राखत त्यांनी तायडेंना पुन्हा जवळच्या दुसऱ्या खासगी रूग्णालयात नेलं. तर तायडे जिवंत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवनेरी रुग्णालय व डॉ. आहुजा यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय.