Malad Crime : शिक्षणाच्या नावाखाली छळ! 8 वर्षीय मुलाला ट्युशन शिक्षिकेने दिले मेणबत्तीचे चटके

Malad Crime : शिक्षणाच्या नावाखाली छळ! 8 वर्षीय मुलाला ट्युशन शिक्षिकेने दिले मेणबत्तीचे चटके

 Tuition Teacher Tortured 8 year Old Student : मालाड पूर्वमधील (Malad Crime) गोकुळधाम परिसरात एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर (Tuition Teacher Tortured Student) आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा संताप उसळला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात (Shocking News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचं नाव राजश्री राठोड असं असून, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी पाडा, मालाड पूर्व येथे राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेच्या आठ वर्षांच्या मुलाला ट्युशनसाठी गोकुळधाम फिल्म सिटी रोडवरच्या एका क्लासमध्ये पाठवण्यात येत होतं. मंगळवारी संध्याकाळी शिक्षिकेने मुलाच्या आईला फोन करून ट्युशन संपल्याची आणि मुलगा सतत रडतोय अशी माहिती दिली. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या मोठ्या मुलीने ट्युशन क्लासमध्ये जाऊन भावाला घरी आणलं. घरी आल्यावरही तो मुलगा सतत रडत होता, मात्र शिक्षिकेने यामागचं कारण ‘अभ्यासाचा कंटाळा’ असल्याचं सांगितलं.

अमेरिकेने भारताला डिवचले! पाकिस्तानसोबत तेल कराराची हातमिळवणी, ट्रम्प सरकारचा दुटप्पी निर्णय?

सत्य आलं समोर

मुलगा घरी आल्यानंतर आईने त्याचे हात पाहिले आणि धक्काच बसला. दोन्ही हातांवर भाजल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. आईने त्याला प्रेमाने विचारलं असता त्याने सांगितलं की, हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केली आणि त्याच्या हातांवर मेणबत्तीचे चटके दिले. या क्रूर प्रकारानंतर मुलाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

महिन्याचा शेवटचा दिवस कसा जाणार? वाचा आजचे राशीभविष्य

पोलिसात गुन्हा दाखल

या घटनेने संतप्त झालेल्या पालकांनी त्वरित कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या अमानवी प्रकारामुळे स्थानिक नागरिकांत आणि पालकांमध्ये भीती व रोष व्यक्त होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube