Ullu app removes Ajaz Khan’s reality show ‘House Arrest’: उल्लू अॅपवरील अभिनेता एजाज ( Ajaz Khan/strong>) खानच्या हाऊस अरेस्ट (House Arrest)या शोवरून मोठा वाद झाला आहे. शोमधून अश्लिलता दाखविल्यावरून टीकेची झोड उठवली होती. याप्रकरणी उल्लू अॅपचे सीईओ आणि एजाज खान याला राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) नोटीस पाठविली. त्यानंतर आता उल्लू अॅपवरून हा शो काढून टाकण्यात आला आहे. तर अश्लिलता पसरविल्याप्रकरणी उल्लू अॅपविरोधात मुंबईत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी एक क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. एजाज खान हा महिला स्पर्धकांवर अश्लील कृत्ये करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. सेक्स पॉझिशन अशा नावाने ही क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपवर देशभरात गदारोळ उडाला होता. भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट लिहिली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळीक देणे थांबवा.
पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राईक झालाच..काँग्रेस खासदाराचं मोठं विधान, नक्की काय म्हणाले?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”
एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला.असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे.
मी माहिती… pic.twitter.com/zeoK4THPnZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2025
एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शोवर तात्काळ बंदी घाला. या शोने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. शिवसेनेच्या (UBT) राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शोमधील एक क्लिप शेअर केली आणि विचारले की अशा ‘अश्लील कंटेंट’ तयार करणाऱ्या कंटेंट अॅप्सवर बंदी का घातली जात नाही.
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…; अजितदादांनी मनातलं बोलून दाखवलं
त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या शोवर कारवाई सुरू केली. राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांना या प्रकरणी समन्स बजाविली. दोघांनाही 9 मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हाऊस अरेस्ट शोविरोधात गुन्हा
हाऊस अरेस्ट शो विरोधात मुंबईतील आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत बजरंग दलाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. गौतम रावरिया यांच्या फिर्यादीवरून अभिनेता अजाज खान, ‘हाऊस अरेस्ट’ वेब शोचे निर्माते राजकुमार पांडे आणि उल्लू अॅपसंबंधीत इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
I have raised this in the standing committee that apps such as this, namely, Ullu App and Alt Balaji have managed to escape the ban by I&B ministry on apps for obscene content. I am still awaiting their reply. pic.twitter.com/evZS1LFvLZ
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) May 1, 2025