मोठी बातमी! अभिनेता एजाज खानच्या कार्यालयात सापडले 35 लाखांचे ड्रग्ज, एकाला अटक
Ajaz Khan : बॉलीवूड अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंगळवारी, 8 ऑक्टोबर रोजी सीमाशुल्क विभागाने (Customs Department) ड्रग्जशी संबंधित प्रकरणात त्याच्या कार्यलयामधील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. माहितीनुसार, सीमाशुल्क विभागाने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात मंगळवारी त्याच्या कार्यलयावर छापा टाकला होता. यापूर्वी देखील याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनीवर बाहेर आहे मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
माहितीनुसार, मुंबई कस्टम्सच्या स्पेशल पोस्टल इंटेलिजन्स ब्रँचने युरोपियन देशातून येणाऱ्या मालाचा पाठलाग केला होता. त्यावेळी माल एजाज खानच्या कार्यालयात पोहोचला असल्याचा सीमाशुल्क विभागाला दिसून आले त्यामुळे अभिनेता एजाज खानच्या कार्यलयावर सीमाशुल्क विभागाने छापा टाकला.
कर्मचाऱ्याला अटक
माहितीनुसार, पोलिसांनी एनडीपीसी कायद्यांतर्गत एजाज खानच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. माहितीनुसार, या कर्मचाऱ्याने एजाज खानच्या कार्यालयाच्या पत्त्यावर 100 ग्रॅम एमडीची ऑर्डर दिली होती. माहितीनुसार, या कर्मचाऱ्याने युरोपमधून ड्रग्ज मागवली होती ज्याची किंमत 30 ते 35 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सुरज गौर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ज्याला आज (9 ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Ratan Tata Health News : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती गंभीर, ICU मध्ये दाखल
‘मिड-डे’ ने दिलेल्या माहितीनुसार, सूरज गौर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की आर्थर रोड तुरुंगात असताना एजाजशी भेट झाली होती. एजाज खानला 2021 मध्ये मुंबई विमानतळावरून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि 2023 मध्ये जामिनावर त्याची सुटका झाली होती.