Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील इंडिया आघाडी संपली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रेखा ठाकूर हे बैठकीला उपस्थित होते.
निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, गाव चलो अभियानाची घोषणा
काय ठरलं बैठकीत?
आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुढच्या टप्प्यात महायुतीतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. आजच्या चर्चेतील पहिल्या टप्प्यात आम्ही समान कार्यक्रमावर चर्चा केली. आज काही मुद्द्यांवर चर्चा झाली असून उरलेल्या मुद्द्यांवर लवकरच चर्चा केली जाईल. आघाडीचा किमान सामायिक कार्यक्रम ठरल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
समान नागरी कायद्याचा मसुदा तयार, ‘या’ राज्यात पहिल्यांदा लागू होणार; काय आहेत तरतूदी?
इंडिया आघाडी संपलीय…
आघाडीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी नाही. ममता बॅनर्जी, नितीशकुमार, आप यांनी इंडिया अलायन्सपासून वेगळी भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्षाने 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. मात्र, समाजवादी सोबत राहतील, असा विश्वास आहे. महाविकास आघाडी इंडिया आघाडी बनणार नाही याची काळजी घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, 5 दिवसांची ईडी कोठडी