निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, गाव चलो अभियानाची घोषणा
Chandrashekhar Bawankule : यंदाचं वर्ष हे संपूर्ण निवडणुकांचं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्यातच आता भाजपनं (BJP)आपला स्पीड वाढवला आहे. भाजपनं आता गाव चलो अभियानाची (Gaon Chalo campaign)घोषणा केली आहे. या अभियानाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी मुंबईमधील (MUmbai)भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. गाव चलो अभियान हे येत्या 4 ते 11 फेब्रुवारीपर्यंत राबवलं जाणार आहे.
हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, 5 दिवसांची ईडी कोठडी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची गॅरंटी आणि अर्थसंकल्पातून देशाला पंतप्रधान मोदींनी आश्वस्त केलेली गॅरंटी आम्ही देशातील गावागावात पोहोचवणार आहोत. आमचे 50 हजार नेते गावागावात जाणार आहेत. प्रत्येक नेत्याला ठरवून दिलेल्या गावामध्ये तो तो नेता एक दिवस मुक्काम करणार आहे.
IND vs ENG : श्रेयस-रोहितचं बॅडलक पण, यशस्वीचं झुंजार शतक; दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व
या गाव चलो अभियानात भाजपचं केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृ्त्व सहभागी होणार आहेत. हा आमचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असणार आहे. या अभियानामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे देखील त्यांना ठरवून दिलेल्या गावांमध्ये एक दिवस मुक्कामी राहणार असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे यांनी सांगितले की, भाजप आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करत आहे.