Video : राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातील एक व्हिडीओ (Video ) समोर आला आहे. ज्यामध्ये मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर प्रशासनातील महिला कर्मचारी कामाच्या वेळेत धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर सामान्यांची काम करण्याऐवजी हे कर्मचारी वेळ वाया घालवत असतील तर कसं होणार? असा प्रश्न सध्या सर्वस्तरावरून विचारला जात आहे.
Pune : महाज्योती, सारथी अन् बार्टीचा पेपर पुन्हा फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवरच बहिष्कार
त्यामुळे आता या प्रकारानंतर मंत्रालय प्रशासन विभाग आणि राज्य सरकार या मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कामाच्या वेळेत डान्स करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार पहाणे महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यभरातील नागरिक मंत्रालयामध्ये काम घेऊन येतात. मात्र मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामे होत नाहीत. अशा तक्रारी वारंवार प्राप्त होतात.
राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाच्या, सातव्या मजल्यावर प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांकडून कामाच्या वेळेत धमाकेदार डान्स? सरकार काय कारवाई करणार?
–#Mumbai #government #maharashtranews #letsuppmarathi @CMOMaharashtra pic.twitter.com/OtuLyYspVR— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 10, 2024
त्यामध्ये जर अशाप्रकारे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयाच्या अक्षरशः खेट्या मारणारे सामान्य नागरिकांच्या कामाचा वेळ हे मंत्रालयातील कर्मचारी वाया घालवत असतील तसेच त्याच महत्त्वाच्या वेळेत ते डान्ससारख्या गोष्टींमध्ये दवडत असतील तर सामान्यांची काम कधीच होणार नाहीत. मात्र त्यांना एवढ्या लांब मुंबईत आल्याचा मनस्ताप मात्र नक्की होईल.
त्यामुळे आता या प्रकरणी शासनाने या नियमांचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. जेणे करून अशा प्रकारे पुन्हा कामाचा वेळ या कर्मचाऱ्यांकडून वाया जाणार नाही. तसेच अशा व्हिडीओ देखील पुन्हा व्हायरल होणार नाहीत.