Viral Video : प्लीज मोदी-जी, एक अच्छी सी स्कूल बनवा दो ना…चिमुकलीची थेट मोदींना विनंती

Viral Video : प्लीज मोदी-जी, एक अच्छी सी स्कूल बनवा दो ना…चिमुकलीची थेट मोदींना विनंती

Jammu Kashmir Girl Requests PM Modi : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील लोहाई मल्हार गावातील एका लहान मुलीने शाळेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ती चिमुरडी म्हणते की मोदीजी, आमची शाळा खूपच अस्वच्छ आहे यामुळे आमचे कपडे खराब होतात. म्हणून मम्मी आम्हाला मारते. कृपया आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवून द्याना अशी विनंती ही चिमुरडी मोदींकडे करत आहे.

चिमुरडी नेमकं काय म्हणते व्हिडिओमध्ये
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुरडी प्रथम पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या तब्येतीबाबत विचारते. यानंतर ती तिचे नाव सीरत नाज असे सांगते. पुढे ती म्हणते- पीएम मोदीजी, मला तुमच्याशी एक गोष्ट सांगायची आहे. मी इथल्या सरकारी शाळेत शिकत आहे. मात्र आमच्या या शाळेची अवस्था खूपच वाईट झाली आहे. असे बोलतच ती मोबाईलच्या कॅमेराद्वारे शाळेची परिस्थिती दाखवते. ती म्हणते बघा किती गलिच्छ आणि खराब आहे. याच ठिकाणी बसवून आम्हाला शिकवले जाते. त्यानंतर ती तुटलेले शाळेचे शौचालय दाखवते.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

त्यानंतर, ती कॅमेरा घेऊन पुढे जात म्हणते की आता मी तुम्हाला शाळेची मोठी इमारत दाखवते. तिने कॅमेरा फिरवला असता शाळेचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून येते. गेली ५ वर्षे इथली इमारत किती घाणेरडी आहे. यानंतर ती एक गलिच्छ मजला दाखवते आणि म्हणते- आम्ही यावर बसून अभ्यास करतो. याठिकाणी आम्हाला बसावे लागत असल्याने आमच्या युनिफॉर्म खराब होतो. युनिफॉर्म घाण झाला की आई आम्हाला मारते.

बिग बॉस फेम प्रियांका चौधरीचा ग्लॅमर्स अंदाज

यानंतर चिमुरडी मोदींना विनंती करते आणि म्हणते की मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकतात तर माझेही ऐका आणि आम्हाला एक चांगली शाळा बनवून द्या. जेणेकरून आम्हाला खाली बसावे लागणार नाही. जेणेकरून आई मारणार नाही. आमची शाळा व्यवस्थित असल्यास आम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येईल. कृपया मोदीजी आमची शाळा बांधून द्या, अशी विनंती ही चिमुरडी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube