Vijay Shivtare: वडील आणि मुलगी हे नाते जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. बापलेकीच्या नात्याला नेहमीच भावनेची किनार असते. मुलगी तिच्या वडिलांच्या खूप जवळ असते. दोघांमधील बंध अतिशय छान असतात. अशीच एक घटना सोमवारी पुन्हा पुढे आलीय. माजी मंत्री व पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना मुलगी डॉ. ममता शिवतारे-लांडे (Mamata Shivtare) हिने किडनी दान दिलीय. सोमवारी मुंबईत किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया पार पडलीय.
आमदार विजय शिवतारे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. किडनी फेल झाल्यामुळे ते डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. त्यावेळी मुलीची ममता जागी झाली. मुलगी ममता शिवतारे लांडे हे वडिलांसाठी आशेची किरण बनून आली. तिने वडिलांना किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यार्पण शस्त्रक्रिया पार पडली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलीय.
खरात साहेब जे बोलतात तेच घडतं; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकातून धक्कादायक दावे
निवृत्त आयपीएस शिवदीप लांडे यांच्या पत्नी
ममता या शिवतारे यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांचा विवाह हा बिहारमध्ये पोस्टिंगला असलेले दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्याशी झालेला आहे. शिवदीप लांडे हे मूळचे विदर्भातील आहे. ते बिहारमध्ये पोस्टिंगला होते. बिहार निवडणुकीपूर्वी राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले होते. त्यांनी एक पक्षही काढला होता. परंतु निवडणुकीत ते अपयशी ठरले आहे.
हॉर्मुज तात्काळ खुली करा अन्यथा… चर्चेच्या दाव्यांदरम्यान ट्रम्प यांची इराणला धमकी
शिवतारेंच्या अडचणीच्या वेळी मुलगी येते धावून
पाच वर्षांपूर्वी आमदार शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता. तेव्हा त्यांना ह्यद्यविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हाही कुटुंबातील कोणीची शिवतारे यांच्याबरोबर नव्हते. तेव्हाही मुलगी ममता हिनेच वडिलांची रुग्णालयात जावून काळजी गेतली होती. आता पुन्हा एकदा मुलगीच शिवतारे यांच्याशी धावून आली आहे.
