Download App

मुंबई हल्ल्यावरील विधान वडेट्टीवारांच्या अंगलट येणार; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा केल्याचा भाजपचा आरोप.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Vijay Wadettivar controversial statement Bjp Compilant election commission : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (
Vijay Wadettivar ) यांनी मुंबई हल्ल्याप्रकरणात एक वादग्रस्त विधान केले होते. पोलिस अधिकारी हेमंत करकरे (Hemant karkare) यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावर भाजपने त्यांना घेरले आहे. आता तर वडेट्टीवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. तसेच निवडणुकीत असे विधान केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार भाजपने (BJP) निवडणूक आयोगाकडे केली आहे.

धंगेकरांचं काम दाखवा अन् 5 हजार मिळवा, हेमंत रासनेंकडून मोठी घोषणा

वडेट्टीवार यांनी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा करून मतदारांची दिशाभूल केली. तसेच अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

वडेट्टीवारांचं ‘ते’ वक्तव्य महाविकास आघाडीला शेकणार? तर्कवितर्कांना उधाण

26/11 मुंबई अतिरेकी हल्ला खटल्यात अजमल कसाब याची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली. सर्व पुरावे, साक्षी तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब यास फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या अपीलामध्ये सुनावणी होऊन अजमल कसाब याची फाशी कायम केली. सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे देशद्रोही विधान केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे व न्यायालयाचा अवमान देखील आहे.

भाजपाच्या निवडणूक विधी विभागाचे सहसंयोजक ॲ‍ड.शहाजीराव शिंदे, ॲ‍ड.मनोज जायस्वाल यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात. अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या व पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह उपसथित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे व राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्यांचे राजकारण करतात. या व्यतिरिक्त, लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, निवडणूक चर्चा नागरी आणि तथ्यात्मक राहील याची खात्री करण्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे, असे तक्रारीत म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज