धंगेकरांचं काम दाखवा अन् 5 हजार मिळवा, हेमंत रासनेंकडून मोठी घोषणा

धंगेकरांचं काम दाखवा अन् 5 हजार मिळवा, हेमंत रासनेंकडून मोठी घोषणा
Hemant Rasane On Ravindra Dhangekar : महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok Sabha Election) प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात लढत होत आहे.
महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यासाठी कॉग्रेस (Congress)  खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जाहीर सभा घेतली आहे. यामुळे या मतरदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
यातच भाजप नेते हेमंत रासनेंनी Letsupp मराठीशी (Letsupp Marathi) बोलतांना, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी गेल्या 13 महिन्यात कसबा मतदारसंघात केलेले काम दाखवा आणि एका कामाला 5 हजार रुपये मिळवा अशी घोषणा केली आहे. हेमंत रासने म्हणाले, देशात मोदीमय वातावरण झालं आहे. गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती झाली आहे. अनेक विकासाची कामे झाली आहे. यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर रविंद्र धंगेकरबद्दल बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. यामुळे उमेदवार कोण आहे याला फार महत्व राहिलेला नाही. जनता पुन्हा एकदा मोदींच्या हातात देश देणार आहे. कसबा मतदारसंघात रविंद्र धंगेकर यांनी आतापर्यंत कोणताही विकास काम केला नाही. यामुळे सध्या कसबा मतदारसंघात वातावरण बदलला आहे.
या लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कसबा मतदारसंघातून 25-30 हजारांचा लीड देऊ असा दावा त्यांनी केला आहे.
याच बरोबर मोठी घोषणा करत हेमंत रासने म्हणाले, गेल्या 13 महिन्यात कसबा मतदारसंघात एकही विकास काम झालेला नाही यामुळे रविंद्र धंगेकर यांनी 13 महिन्यात या मतदारसंघात केलेले काम दाखवा आणि एका कामाला 5 हजार रुपये मिळवा अशी घोषणा त्यांनी Letsupp मराठीशी बोलतांना केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज