Download App

‘सगळचं हास्यास्पद आहे’, वडेट्टीवारांनी भात्यातून सोडला पहिला बाण

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Vijay Wadettiwar Attack On Maharashtra Government :राज्यातील प्रकल्पांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ची स्थापना केली आहे. यावरून आता काँग्रेसने टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली आहे. मलिदा खायचा असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी यांना वेळ नाही असे म्हणत जे काही सुरू आहे ते सर्व हास्यास्पद असल्याचं टीकास्त्र विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भात्यातून सत्ताधाऱ्यांवर पहिला बाण सोडला आहे.

मोदींच्या भाषणानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्ससाठी ‘सोनिया’चे दिन ; गुंतवणुकदार मालामाल

पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री नियुक्तीसाठी एवढा वेळ होत असून, 28 मंत्री कार्यरत आहेत. 28 मंत्री 28 जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते आणि जनतेला न्याय देऊ शकले असते, परंतु तिथे पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागते हे दुर्दैवी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

वॉर रूमवरून हल्लाबोल

यावेळी वडेट्टीवारांनी अजित पवारांनी सुरू केलेल्या नव्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ वरून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात येत असलेली देखरेख बाजूला सारून अजित पवारांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. वॉर रूममध्ये आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे. कालच्या झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीतून आपल्याला दिसल असेल तीन दिशेने तीन तोंड होती. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात. मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी यांना वेळ नाही असे वडेट्टीवार म्हणाले.

अमित शाहांवर कारवाई कराच! कलावती बांदूरकरांनी थेट PM मोदींनाच धाडले निवेदन

राहुल गांधींची भीती संपूर्ण भाजपला 

राहुल गांधी नावाची भीती संपूर्ण भाजपला वाटत आहे, गांधींनी, नेहरूंनी या देशासाठी बलिदान दिल आहे. त्यामुळे गांधी नावाची दहशत अजूनही भाजपला आहे. जसं मुघलांच्या काळात मुघलांना धनाजी आणि संताजीशी होते. तशीच दहशत भाजपने घेतलेली आहे. अविश्वास ठरावाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी केवळ काँग्रेसवर ताशेरे ओढले. त्यांनी काय केलं, त्यांच्या कोणत्या उपलब्धी ते काही ते बोलले नाही. केवळ भाषणातून काँग्रेसचा विरोध केला ज्या मणिपूर मुद्द्यावर अविश्वास ठराव आणला होता, त्यावर ते पहिले दीड तास काहीच बोलले नाही.

देशाचे गृहमंत्री ठासून खोटं बोलतात

यावेळी वडेट्टीवारांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या देशाने पाहिल आहे, या देशाचे गृहमंत्री किती ठासून खोट बोलतात आणि देशाला किती चुकीची माहिती देतात. हे कलावतीच्या कालच्या स्टेटमेंट वरून आपल्याला समजले आहे.
राहुल गांधींचा सामाजिक काम आणि जो शब्द आहे, तो पक्का आहे. हे देशवासीयांना माहित आहे. केवळ कलावतीच नाही तर त्यामध्ये निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचं काम राहुल गांधीनी पूर्ण केल आहे. म्हणजे या देशात सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. हे गृहमंत्र्यांच्या भाषणातून देशाला कळून चुकल आहे.

‘एमआयडीसी’च्या पत्राचा वाद चिघळला! शिंदेंनी अजितदादांचं नाव घेत रोहित पवारांना सुनावलं

आढावा बैठकीत नेमकं काय?

यावेळी त्यांनी पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीवरदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, ही काही सीट वाटपाची आढावा बैठक नसून कोणत्या मतदारसंघातील राजकीय स्थिती कोणत्या पक्षाचा प्राबल्य, आमच्या बूथ गठन झाले की नाही. तसेच आमची स्थिती काय आहे याबाबतची आहे.

आम्ही राज्यातील अनेक नेत्यांच्या महिलांचे फ्लाइंग किस पाहिलेत; राऊतांचं विधानानं वाद उफळणार

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर काय स्थिती या सर्वांचा आढावा घेऊन काँग्रेससाठी किती अनुकूल आहे याचादेखील आढावा घेतला जात आहे. ज्यावेळेस सीट वाटपाचा फॉर्म्युला येईल तेव्हा आम्हाला सांगता येईल की पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद मध्ये कोणाचा वर्चस्व आहे आणि त्याची तयारी म्हणून आढावा बैठक घेत आहोत.

follow us

वेब स्टोरीज