एनजीओचा संचालक ते सरकारी कंत्राटदार… रोहित आर्य कोण होता ?

Rohit Arya: त्याला प्रत्युत्तर देताना पवईचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Rohit Arya Powai Studio

Rohit Arya Powai Studio

Who was Rohit Arya: मुंबईतील पवईभागातील महावीर बिल्डिंगमध्ये शुक्रवारी एक मोठं थरारनाट्य (Powai Hostage Case) घडलं. आर स्टुडिओमध्ये तब्बल सतरा अल्पवयीन मुला-मुलींना डांबून ठेवलं होतं. या मुलांच्या हत्येचा प्लॅनच रोहित आर्य (Rohit Arya) याने रचला होता. पिस्तूल, केमिकल त्याच्याकडे होते. स्टुडिओला आग लावून स्वतःसाठी मुलांना संपविण्याचा प्लॅन त्याचा होता. मुलांची सुटका करण्यासाठी स्टुडिओच्या बाथरुममधून पोलिस अधिकारी व कर्मचारी आत गेले. पण रोहित आर्यने आपल्याकडील पिस्तूलमधून गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना पवईचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. थेट मुलांना संपविण्याचं टोकाचे पाऊल उचलणाऱ्या रोहित आर्या हा आहे कोण ? हेच जाणून घेऊया…

मोठी बातमी ! पवईतील स्टुडिओमध्ये मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर


सोशल मीडियावर फिल्ममेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी ओळख

रोहित आर्या हा मूळचा पुण्यातील असल्याचे सांगितलं जातंय. तो नागपूर येथे शिक्षक ही होता. तसेच अप्सरा नावाचा युट्यूब चॅनेलही तो चालवत होता. त्याला डान्स, अॅक्टिंगची आवड होती. तो पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करत होता. तर सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी दाखवत होता.


प्रोजेक्ट लेट्स चेंजचा संस्थापक व संचालक

रोहित आर्यने लेट्सचेंज या नावाने एक संस्था काढली होती. ही संस्था एनजीओ म्हणून काम पाहत होती. ही संस्था शाळांमधील स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूत बनविण्यात त्या संस्थेचा संस्थापक व संचालक होता. 2013 मध्ये गुजरातमध्ये त्याने स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम सुरू केला होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी याबाबत त्यांचे कौतुक केलं होतं. या उपक्रमावरून गुजरातमध्ये महात्मा गांधी स्वच्छता अभियान सुरू झाले होते. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मिशन स्वच्छ भारत सुरू केले होते. महाराष्ट्रात माझी शाळा, सुंदर शाळा हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला होता. या प्रकल्पाचे डिझाइन रोहितने केल्याचा दावा त्याचा होता. परंतु सरकारने ते नाकारले होते. त्यामुळे त्याने सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. तो एक सरकारी कंत्राटदार होता. दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री त्याला एका शाळेचं टेंडर मिळालं होतं. ते टेंडर तब्बल दोन कोटींच होतं. पण त्याचं पूर्ण पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने आंदोलनही केलं होतं. पैसे न मिळाल्याने तो आर्थिक अडचणीत आला होता. त्यातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Exit mobile version