मुंबई : मुंबईच्या दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधील (Kohinoor Square) इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री मोठी आग लागली होती. या आगीत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, कंत्राटदारांकडून नियमांचं उल्लंघन करून गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळंच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी होत आहे. आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही यावर आता प्रतिक्रिया दिली. कोहिनूर स्क्वेअरच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल त्यांनी केली.
‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य
कोहीनूर स्क्वेअरमध्ये अचानक आग लागल्यानंतर स्थानिकांकडून कंत्राटदाराकडून नियमबाह्य पद्धतीने पार्किंग केली जात असल्याचा आरोप केली. त्यानंतर लाड यांनी पालिका आणि संबंधित विभागाला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या अचानक लागलेल्या आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. येथील ठेकेदारांची वागणूक चांगली नाही, या प्रकरणाची चौकशी करावी, असं लाड म्हणाले.
या टॉवरमध्ये अनेक ऑफिसेस असून, संबंधित ठेकेदाराच्या विरोधात वेळोवेळी तक्रार दाखल करुन देखील कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे या विषयी त्वरीत कार्यवाही करून ठेकेदारास कार्यमुक्त करा व त्यास जबाबदार असणार्यावर आवश्यक ती कारवाई करा, अशी मागणी आमदार लाड यांनी केली आहे.
26 तक्रारी दाखल झाल्या. मात्र, त्यांच्यावर कोणीही कारवाई केली नाही. कृपया उत्तर द्या, त्याला जबाबदार कोण, मुख्य अग्निशमन अधिकारी, वॉर्ड अधिकारी, मुख्य अभियंता की कंत्राटदार? कृपया जनेतला उत्तर द्या, असा प्रश्न या निमित्ताने लाड यांनी उपस्थित केला आहे.
कोहिनूर स्क्वेअरमध्ये, स्मोक डिटेक्टर सिस्टमची देखभाल नाही, असंबद्ध बहुस्तरीय कार पार्किंग क्षेत्र आहे. २ चाकी आणि ४ चाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग आहे. अग्निशमन विभागाने घालून दिलेल्या सामान्य नियमांचे पालन केले जात नाही. अनधिकृत आणि बेकायदेशीर यांत्रिक कामांसाठी केंद्र असून, जेथे लोक अनेकदा दारूच्या नशेत आणि प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावाखाली आढळतात, असे याठिकाणी नमूद करण्यात आले असून, अनेक गाड्या अनेक महिन्यांपासून विनापरवाना आनंदीकृत गॅरेज याठिकाणी उभ्या असल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे.
या पत्राच्या माध्यमातून आमदार लाड यांनी महापालिका आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे सांगितले आहे.