Maratha Reservation : ‘मराठा नाही, पण ब्राम्हण मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं’; फडणवीसांसाठी प्रसाद लाड यांची बॅटींग
Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Laad) यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांना दिलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून GR निघाला
प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे जे आंदोलन करत आहेत. आमचं आंदोलनाला समर्थन आहे, पण मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांचा ज्या पद्धतीत उल्लेख केला तो निषेधार्थ आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं होतं. मात्र, नाकर्ते उद्धव ठाकरे सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, त्यांना काही न बोलता फडणवीसांबद्दल बोलत आहात, असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
Raj Thackeray : प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना भावनिक पत्र…
तसेच आत्तापर्यंत जे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं असल्याचंही लाड म्हणाले आहेत. आता सध्या मनोज जरांगे जे आरोप करीत आहेत ते, राजकीय सुडबुद्धीने करत आहेत, त्यांचा बोलवता धनी कोणतीही दुसराच असल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे.
फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप
मराठा आंदोलन शांततेत न राहता हे आंदोलन आता खासदार, आमदार, सरकारच्या घरापर्यंत जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन नेमकं काय साध्य करायचंयं? असा सवालही त्यांनी जरांगे यांना केला आहे.
काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
बस्स् झालं आता हे लहान आणि मोठा भाऊ. लहान मोठ्याला मानत नाही मग कशाला पाहिजे लहान आणि मोठं. लहान भाऊ आमचचं खातो तर गोड लागतं का? आता मोठ्या भावाला द्यायची वेळ आली आहे, तर म्हणता आम्ही रस्त्यावर येऊ, या रस्त्यावर तुम्हाला कोणत्या सरकारची फूस आहे तर बघू. यातला एक उपमुख्यमंत्री कलाकार आहे त्याच्याकडं बघायला लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. तसेच बाळा तू लोकांना थांबव तू लोकांना बिघडवू नकोस. एकतर सर्व भाजप विद्रुप करुन टाकलंय, रंगीबेरंगी लोक आणून ठेवलेत सरकारमध्ये. आम्ही तुमचा आदर करतो पण तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या, कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. तुम्हाला लोकांमध्ये भांडणं लावून दिल्याशिवाय जमतंच नाही इतक्या खोड्या काढता तुम्ही? असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला आमचं समर्थन असून समाजासाठी जातीसाठी माती खाऊ पण असं कोणी चालवणार असेल तर ते थांबल पाहिजे, अशी विनंतीही आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना केली आहे.