महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव; डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणाला धक्कादायक वळण

Anjali Damania: फेब्रुवारीपासून आतापर्यंत तिने गौरीच्या शरीरावर अनेकदा मारहाणीच्या खुणा बघितल्या. म्हणजे तिल मारहाण व्हायची.

Woman's abortion, Anant Garje's name as husband; Dr. Gauri Palave's suicide case takes a shocking turn

Woman's abortion, Anant Garje's name as husband; Dr. Gauri Palave's suicide case takes a shocking turn

Anant Garje Wife Gauri Palve-Garje Death : भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहायक अनंत गर्जे (Anant Garje) यांची पत्नी डॉ. गौरी (Gauri Palve-Garje) हिने राहत्या घरात जीवन संपविले आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी संबंध होते. त्यातून ती महिला गर्भवती राहिली होती. त्याचे थेट पुरावे गौरी हिला घरात मिळाले होते, असा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलाय.

कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय; गौरी गर्जे मृत्यूप्रकरणात पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया

अंजली दमानिया यांनी मयत डॉक्टर गौरी पालवे यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काही खळबळजनक दावे केले आहेत. गौरीला पती अनंज गर्जे हा मारहाण करत होता, असा दावाही दमानिया यांचा आहे. दमानिया या सांगतात की, गौरीची मैत्रिणी सांगत होत्या की, ती रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. एक मैत्रीण तिला दीड वर्षांपासून ओळखते. पण, फेब्रुवारीपासून आतापर्यंत तिने गौरीच्या शरीरावर अनेकदा मारहाणीच्या खुणा बघितल्या. म्हणजे तिल मारहाण व्हायची. (Woman’s abortion, Anant Garje’s name as husband; Dr. Gauri Palave’s suicide case takes a shocking turn)


मी घाबरलो अन् फ्लॅटमध्ये प्रवेश…, डॉ. गौरी प्रकरणात नव वळण? अनंत गर्जेंचा मोठा खुलासा


घरातच आढळली डॉक्टरांची चिठ्ठी

अनंत गर्जे आणि गौरी या लग्नानंतर बीडीडी चाळीत राहत होते. त्यानंतर एका टॉवरमध्ये संसार हलविण्यात आला. त्यावेळी घराची आवराआवर करत असताना गौरीला काही कागदत्रपत्रे मिळाली. ती कागदपत्र गर्भपाताबाबतची होती. त्या महिलेचे किरण होते आणि पतीचे नाव अनंत गर्जे असे लावले होते. त्यावरून दोघांमध्ये कडक्याची भांडणे झाली होती, असे मला गौरीच्या आई-वडिलांनी सांगितले आहे, असे अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


लग्नानंतर महिलेशी चॅटिंग, चॅट पकडताच धमकी

अनंत गर्जे व गौरी यांचा विवाह दहा महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर अनंत गर्जे हा संबंधित महिलेच्या संपर्कात होता. ते चॅटिंग करत होते. ही चॅटिंगही गौरीने पकडले होते आणि नणंद शीतलला याबाबत सांगितले होते. परंतु नणंदने भावाची बाजू घेतली. तुला रहायचे असेल, तर त्याच्यासोबत राहा, नाहीतर आम्ही त्याचे दुसरे लग्न करून देतो, अशी धमकी नणंदने दिली होती. त्यामुळे अनंतचे चॅटिंग गौरीने वडिलांना पाठविले होते, असे अंजली दमानियांनी सांगितले आहे.

Exit mobile version