Worli Hit And Run Case main accused Mihir Shah and 12 in custody पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच वरळीत (Worli Hit And Run Case) रविवारी (7 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला होता. या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर वरळी पोलिसांनी (Worli Police) फरार असलेला मुख्य आरोपी मिहिर शाहसह (main accused Mihir Shah) 12 जणांना ताब्यात घेतलं आहे.
Worli (Mumbai) hit-and-run case | Mumbai Police arrest accused Mihir Shah, who was absconding.
— ANI (@ANI) July 9, 2024
यामध्ये सुरूवातीला वरळी पोलिसांनी आरोपीचे वडिल आणि शिंदे गटाचे उपनेते राजेश शाहा (Rajesh Shah) आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार होता. आता मात्र पोलिसांनी फरार असलेला मुख्य आरोपी मिहिर शाहसह 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. शहापूर येथून पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता काहींवेळातच पोलीस या सर्वांना न्यायालया पुढे हजर करणार आहेत.
‘एक नातू अदानींचा ड्रायव्हर तर दुसरा अंबानींकडे नाचतो’; नितेश राणेंची सडकून टीका
नेमकी घटना काय?
वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.
Akshay Kumar: ‘सरफिरा’ हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्याने थेटच सांगितले
या अपघातात कार चालक पळून गेला होता. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शाहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील आहेत. मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार होता.