चंदीगढ : भटके कुत्रे किंवा जनावरे चावल्यास, त्यांच्या हल्ल्यांच्या प्रकरणात नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार प्रामुख्याने जबाबदार असेल, असे निरीक्षण नोंदवत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये प्रत्येक खुणेला किमान दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा मोठा आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. याशिवाय, कुत्रा चावल्यामुळं त्वचेवर जखम झाली किंवा मांस निघाले असेल तर प्रत्येकी 0.2 सेमी जखमेसाठी किमान वीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असेही निर्देश दिले आहेत. (10,000 compensation for every bite mark of a dog, ordered by the High Court)
देशात मागील काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या (Stray dogs) संख्येत कमालीची वाढ झाली. भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नुकतेच वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा कुत्र्यांच्या चाव्यानंतर मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Haryana High Court) एक महत्वाचा निर्णय दिला आहे.
‘तो’ तरुण आता ‘विराट’ खेळाडू झाला! ड्रेसिंग रुममधील आठवण सांगत सचिनची भावनिक पोस्ट
या निर्णयानंतर उच्च न्यायालयाने 193 याचिका निकाली काढल्या. पंजाब व हरियाणा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड यांनाही अशी भरपाई निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या उपायुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठात भटक्या प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांशी संबंधित 193 याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरू होती.
पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार
यावेळी न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांनी सांगिले की, मृत्यूंची वाढती संख्या व रस्त्यांवर भटक्या प्राण्यांचे प्रमाण चिंतानजक आहे. त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळं आता राज्याने भार वाढून घेणे आणि जबाबदारी खाद्यावर घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कुत्रा चावल्यानंतर एखाद्याने आवश्यक कागदपत्रांसह भरपाईसाठी अर्ज केला तर समित्यांनी त्यावर त्वरित कारवाई करावी. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अर्ज चार महिन्यांत निकाली काढावा. कोणताही तक्रार किंवा अपघाताबाबत तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असंही न्यायालय म्हणाले.
उच्च न्यायालयाने म्हटलं की, नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी प्रामुख्याने राज्याची असेल. राज्य सरकारची इच्छा असल्यास ते कुत्र्याशी संबंध असलेल्या आरोपी व्यक्ती, एजन्सी किंवा विभागाकडून नुकसानभरपाईची रक्कम वसूल करू शकते. शिवाय, राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी करण्याचे आदेश दिलेत.