Download App

‘तो’ तरुण आता ‘विराट’ खेळाडू झाला! ड्रेसिंग रुममधील आठवण सांगत सचिनची भावनिक पोस्ट

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli) 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय (ODI) शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे. (Run machine Virat Kohli scored his historic 50th ODI century.)

विराट कोहलीच्या या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर याने एक भावनिक पोस्ट करुन विराटचे अभिनंदन आणि कौतुक केले. सचिन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ज्यावेळी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मी तुला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी संघातील खेळाडूंनी तुझी चेष्टा केली होती. त्यांनी तुला माझ्या पाया पडायला लावले होते. तो प्रसंग आठवून मी त्यावेळी दिवसभर हसत होतो. (After his 50th century, Sachin Tendulkar congratulated and appreciated Virat Kohli with an emotional post)

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये भूकंप; बाबर आझम सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरुन पायउतार

मात्र लवकरच तू तुझ्या क्रिकेटबद्दलच्या पॅशन आणि स्कीलने माझ्या मानला स्पर्श केलास. मला आनंद होत आहे की तो तरूण मुलगा आता ‘विराट’ खेळाडू झाला आहे. एका भारतीयाने माझा विक्रम मोडल्यानं मी खूप आनंद आहे. त्यातही हा विक्रम एका मोठ्या सामन्यात, वर्ल्डकप सेमी फायनल सामन्यात मोडला आहे. तेही माझ्या होम ग्राऊंडवर हा तर दुग्ध शर्करा योग आहे, अशी पोस्ट सचिनने लिहिली आहे.

सचिनचे दोन विक्रम विराटने मोडले :

सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 एकदिवसीय शतके झळकावली होती. किंग कोहली आपला 291 वा वनडे सामना खेळत आहे. यातच त्याने ऐतिहासिक 50 वे शतक झळकावले आहे. तर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वे शतक झळकावले आहे. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये 1 शतक झळकावले आहे.

‘ऐश्वर्याबद्दल घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मागितली माफी

याशिवाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर झाला आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने एका विश्वचषक सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. पण आता या विक्रमावर कोहलीचेही नाव कोरले आहे. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात कोहली हा एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे

Tags

follow us