‘ऐश्वर्याबद्दल घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मागितली माफी
Abdul Razzaq Apology: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने (Abdul Razzaq) आपल्या संभाषणात ऐश्वर्या राय बच्चनबद्दल (Aishwarya Rai) एक घाणेरडे वक्तव्य केले आहे. जर इरादे चांगले नसतील आणि आम्ही ऐश्वर्या रायशी लग्न करून हुशार मुले जन्माला घालण्याचा विचार केला तर असे होणार नाही, असे अब्दुल रज्जाक म्हणाले. अब्दुल रज्जाक एका टीव्ही चॅनलसाठी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या (Pakistan) खराब कामगिरीवर बोलत होता. त्याने खेळाडूंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खेळाडूंचे हेतू सदोष होते आणि त्यामुळेच ते कामगिरी करू शकले नाहीत, असे रझाकने सांगितले.
रज्जाकच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलला सामोरे जावे लागले. प्रकरण वाढतच गेल्याने रज्जाक यांना स्वतः पुढे येऊन माफी मागावी लागली. अब्दुल रज्जाकने हा व्हिडीओ जारी करून सांगितले की, त्याची जीभ घसरली आहे, यासाठी तो खूप लाजला आहे आणि ऐश्वर्या रायची माफी मागतो.
रज्जाकने ऐश्वर्याबद्दल काय म्हणाला…
“आम्ही खेळलो तेव्हा आमचे इरादे स्पष्ट होते. त्यामुळेच आम्ही युनूस खानच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये विश्वचषक जिंकला. युनूसचे इरादे स्पष्ट होते. आज आमचा हेतू बरोबर नसल्यामुळे आम्ही हरतोय. आता आम्हाला ते शक्य नाही. विचार करा की आपण ऐश्वर्या (राय) सोबत लग्न करू आणि तिच्यापासून एक सद्गुणी संतान जन्माला घालू. आपल्याला प्रथम आपली विचारसरणी सुधारावी लागेल.
World Cup 2023 : नाणेफेक जिंकून टीम इंडियाची फलंदाजी; रोहित शर्माचं तुफान
रझाकने हे सांगताच त्याच्या शेजारी बसलेले माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल हसले. हे सांगण्यापासून त्याला कोणीही थांबवले नाही. मात्र, ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रज्जाकवर बरीच टीका होऊ लागली.
पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार वकार युनूस, मोहम्मद युसूफ आणि शोएब अख्तर यांनी अब्दुल रज्जाकच्या या विधानावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. शाहिद आफ्रिदीने सांगितले की, रज्जाक काय म्हणाला आणि निघून गेला हे मला माहित नाही. आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा त्याने ही क्लिपनंतर पाहिली तेव्हा त्यालाही ती खूप विचित्र वाटली. रज्जाक व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला की, काल पत्रकार परिषदेत क्रिकेटवर चर्चा होत होती. बोलता बोलता माझी जीभ घसरली. मी दुसरे उदाहरण द्यायला हवे होते, पण माझ्या तोंडून ऐश्वर्याचे नावच निसटले. मी असे करायला नको होते. मी त्याची मनापासून माफी मागतो.