Gujrat 2002 Riots : गुजरात येथील नरोडा गाम हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या हत्याकांडात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर आता यावर न्यायालयाने मोठा निर्णय देत यातील सर्व 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. अहमदाबाद शहरासह संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये 28 फेब्रुवारी रोजी नरोडा येथे 11 लोकांना जिवंत जाळण्यात आले होते.
2002 Gujarat riots | All accused acquitted in Naroda Gam massacre case pic.twitter.com/vwk4qryz29
— ANI (@ANI) April 20, 2023
गुजरातच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी (२० एप्रिल) या प्रकरणी निकाल दिला आहे. या हत्याकांडात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आले. होते. त्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती.
या खटल्यात भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह एकूण 86 आरोपी होते, परंतु त्यापैकी 18 जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. नरोडा ग्राम खटल्यातील आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 143 (बेकायदेशीर सभा), 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्रांनी सशस्त्र दंगल), 120B (गुन्हेगारी कट) या खटल्याची सुनावणी सुरू होती.
नरोडा गाम हत्याकांडातील मुख्य आरोपी माया कोडनानी राजकारणी होण्यापूर्वी डॉक्टर होत्या. नरोडा येथे त्या स्वतःचे हॉस्पिटल चालवत होत्या, पण RSS मध्ये गेल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. त्यांच्या भाषणांमुळे त्या हळूहळू प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर पक्षाने त्यांना 1998 मध्ये विधानसभेचे तिकीट दिले यात त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्या गुजरात सरकारमध्ये मंत्री झाल्या होत्या.