NDA Meeting : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व पक्षांनी मिळून सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. आता एनडीएच्या खासदारांचे 10 वेगवेगळे गट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गट पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेणार आहे. ज्यामध्ये सर्व खासदार आपल्या क्षेत्राची माहिती पीएम मोदींना देतील, तसेच 2024 साठी रणनीती बनवणे सोपे होईल.
25 जुलैपासून या बैठकांना सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये दररोज 2 वेगवेगळ्या प्रदेशांची बैठक होणार आहे. पहिल्या दिवशी यूपी आणि ईशान्येची बैठक होणार आहे. ज्यामध्ये या दोन्ही प्रदेशातील खासदार उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक गटात 35 ते 40 खासदार असतील. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत एनडीएच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या बैठका होणार आहेत.
शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा
याच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशच्या पहिल्या बैठकीत संजीव बल्यान आणि अजय भट्ट यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने सरचिटणीस तरुण चुग आणि सचिव ऋतुराज सिन्हा समन्वय करणार आहेत. खासदारांना सांगण्यात आले आहे की ते त्यांच्या कामाचा अहवाल तयार करू शकतात. यादरम्यान खासदारांकडून अगदी जमिनीच्या पातळीवरील अभिप्राय घेतला जाईल. एनडीएला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या बैठका होत आहेत.
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली
भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दिल्लीतील बैठकीनंतर एक निवेदन जारी केले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका लढवतील आणि सलग तिसऱ्यांदा ‘प्रचंड बहुमताने’ सत्तेवर येतील, असे म्हटले आहे. यावेळी एनडीएच्या मित्रपक्षांनी देशाच्या विकासाचे कौतुक केले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव बैठकीत मंजूर केला. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेचे मु्ख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराव मांडला, तर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) के.के. पलानीस्वामी आणि असमगण परिषदेचे (एजीपी) अतुल बोरा यांनी त्याला पाठिंबा दिला.