Firecracker Explosion Death : दिवाळीच्या सणादरम्यान देशभरात मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी केली जाते. पण फटाके उडवताना थोडासा निष्काळजीपणा देखील खूप महागात पडू शकतो. असाच काहीसा प्रकार बंगळुरू येथे घडला आहे. फटाके फोडताना एक व्यक्ती फटाक्यांच्या डब्ब्यावर बसला आणि फटाक्याच्या स्फोटानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (VIDEO ) हा भीषण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय शबरिश याच्या सहा मित्रांनी फटाक्यांच्या बॉक्सवर बसण्याची पैज लावली होती. सांगितलं जात आहे की, तरुणाने दारूच्या नशेत ही पैज स्वीकारलं देखील. पैज अशी होती की डब्ब्याच्या खाली फटाके पेटवण्यात येतील आणि तो त्या डब्ब्यावर बसून दाखवेल. इतकेच नाही तर पैज जिंकल्यावर त्याला ऑटो घेऊन देण्याचे देखील कबूल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी! फटाके फोडताना 100 जण जखमी, 32 लहान मुलांचा समावेश
या घटनेत सहभागी सर्वानी दारू घेतलेली होती. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की तरूण डब्ब्यावर बसला आहे आणि जवळपास त्याचे मित्र उभे आहेत. मित्र फटाके पेटवून पळून जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तर पैज स्वीकारणारा तरूण डब्ब्यावर बसून राहतो, काही क्षणात फटाक्यांचा मोठा स्फोट होतो.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की स्फोटानंतर डब्ब्यावर बसलेला तरूण खाली पडतो. धूराचे लोट कमी झाल्यावर आजूबाजूचे सर्वजण पाहायला पुढे येतात. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं, की या घटनेनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं. येथे त्याचा मृत्यू झाला.
बंगळुरूमध्ये फटाके फोडताना एक व्यक्ती फटाक्यांच्या डब्ब्यावर बसला आणि फटाक्याच्या स्फोटानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा भीषण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. #FirecrackerExplosionDeath #Firecracker pic.twitter.com/Ti2jcPNkHe
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 5, 2024