Video : गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ! अन् रोहित पवारांनी जंगली रमीमध्ये व्यस्त कोकाटेंचा व्हिडीओ आणला समोर

Video : गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ! अन् रोहित पवारांनी जंगली रमीमध्ये व्यस्त कोकाटेंचा व्हिडीओ आणला समोर

Rohit Pawar Share Video of Agricultural Minister Manikrao Kokate Playing Rummy Game on Mobile : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विविध वादग्रस्त वक्तव्ये करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. त्यात आता कोकाटेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ते म्हणजे आता कोकाटेंचा थेट जंगली रमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात त्यांना जंगली रमी पे आओ ना महाराज असं म्हणत कोकाटेंना खोचक टोला लगावला आहे.

Beed Crime : प्रेमाचा भयानक शेवट! प्रेयसीने बोलावलं, नातेवाईकांनी ठेचून मारलं; तरुणाची रस्त्यावरच हत्या

काय म्हणाले रोहित पवार?

गली रमी पे आओ ना महाराज …!
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या. असं म्हणत रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी कोकाटेंना खोचक टोला लगावला आहे.

चीनचं धरण भारताला टेन्शन! चीनी पंतप्रधानांची घोषणा अन् कामाला सुरुवात; भारताच्या कोंडीचा प्लॅन?

दरम्यान आता रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर राज्यातील राजकराण पु्न्हा तापणार आहे. राज्य सरकारच्या अडचणी यामुळे वाढू शकतात. नुकत्याच विधान भवनातील मारामाऱ्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरलेले असताना आता कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओची भर पडली आहे. एकीकडे राज्यात शेतकरी आणि विरोधक यांच्याकडून कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. मात्र दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री मात्र थेट रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकाटेंचा हा व्हिडीओ विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल आहे, एवढं नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube