Download App

मोठी कारवाई, मध्य प्रदेशात चकमकीत तीन महिलांसह 4 नक्षलवादी ठार

Naxalite Encounter :  मध्य प्रदेशातील बालाघाट (Balaghat) जिल्ह्यात सुरक्षा दलांनी  मोठी कारवाई करत तीन महिलांसह 4 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

  • Written By: Last Updated:

Naxalite Encounter :  मध्य प्रदेशातील बालाघाट (Balaghat) जिल्ह्यात सुरक्षा दलांनी  मोठी कारवाई करत तीन महिलांसह 4 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलांकडून (Security Forces) देण्यात आलेल्या माहितीनुसार, पचमा दादरच्या डोंगराळ भागात ही कारवाई करण्यात आली आहे. या चकमकीबाबत माहिती देताना विशेष महासंचालक (नक्षलवादी) पंकज श्रीवास्तव (Pankaj Srivastava) म्हणाले की, सुरक्षा दलांनी एक हँडग्रेनेड, एक रॉकेट लाँचर, एक 315 रायफल आणि काडतुसे देखील जप्त केली आहेत. काही नक्षलवादी चकमकीच्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून बक्षीस जाहीर

तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या आमच्या संकल्पाकडे सतत काम करत आहे. आज बालाघाटमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत, ज्यात 3 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. त्यांच्याकडून रॉकेट लाँचरसह अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकार या घटनेत चांगले निकाल देणाऱ्या पोलिसांना निश्चितच बक्षीस देईल.

सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कुकानार पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार मारले. सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.

follow us