Amit Shah On Cyber Security : देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार होत आहे त्यामुळे सायबर फसवणूक (Cyber Security) देखील वाढत चालली आहे. माहितीनुसार, देशात तब्बल 46 टक्के डिजिटल व्यवहार होत आहेत. त्यामुळे वाढत असणारी ही सायबर फसवणूक रोखण्यासाठी आणि सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता तब्बल 5,000 ‘सायबर कमांडो’ना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. याच बरोबर आता वेब-आधारित डेटा रजिस्ट्री स्थापित करणे आणि सायबर गुन्ह्यांची माहिती शेअर करण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.
यावेळी अमित शहा म्हणाले की, सायबर गुन्ह्यांना कोणतीही सीमा दिसत नाही त्यामुळे सायबर सुरक्षेशिवाय राष्ट्रीय सुरक्षा अशक्य आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, तंत्रज्ञान हे मानवी जीवनासाठी वरदान आहे पण तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेक धोकेही निर्माण होत आहेत. म्हणूनच सायबर सुरक्षा आता फक्त डिजिटल जगापुरती मर्यादित राहिली नाही तर ती राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा पैलू बनली आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेशिवाय कोणत्याही देशाचा विकास होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
विविध बँका, आर्थिक मध्यस्थ, पेमेंट एग्रीगेटर, टेलिकॉम सर्विस प्रदाते, आयटी मध्यस्थ आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या प्रतिनिधींसह सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर (CFMC) स्थापन करण्याची घोषणाही अमित शाह यांनी केली.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, या सर्व एजन्सी ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांवर त्वरित कारवाई करून आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकत्रितपणे काम करतील. CFMC च्या माध्यमातून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी सहकारी संघवादाचे उदाहरण ठेवतील.
मराठमोळा ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षीस
मेवात, जामतारा, अहमदाबाद, हैदराबाद, चंदीगड, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथे सात संयुक्त सायबर समन्वय पथकांच्या स्थापनेचे चांगले परिणाम मिळाले आहेत आणि I4C ने सायबरडोस्ट उपक्रमांतर्गत विविध सोशल मीडिया हँडलवर प्रभावी जनजागृती मोहीम चालवली आहे.असेही यावेळी ते म्हणाले.