Download App

52 लाख मतदारांची नावं हटवली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Bihar Assembly Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. राजकीय पक्षांकडून

  • Written By: Last Updated:

Bihar Assembly Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2025) कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या बिहारमध्ये वैध मतदारांची यादी करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेबाबत आयोगाने मंगळवारी एक मोठी अपडेट दिली आहे.

या अपडेटनुसार, आयोगाने पडताळणी दरम्यान बिहारमध्ये 52.30 लाख मतदारांना मतदान यादीतून काढून टाकले आहे. या आकडेवारीत मृत मतदार, इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थलांतरित झालेले मतदार, दोन ठिकाणी नोंदणीकृत मतदारांची नावे समाविष्ट असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये 18 लाख 66 हजार 689 मतदार मृत आहे. तर 26 लाख 1031 मतदार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. 7 लाख 50 हजार 742 असे मतदार आहेत ज्यांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी झाली आहे. 11 हजार 484 असे मतदार आहेत. ज्यांचा पत्ता माहित नाही. जे मतदार त्यांच्या पत्त्यावर सापडले नाहीत ते एकूण 6.62 टक्के आहेत. 24 जून 2025 पर्यंत, एकूण 7,89,69,844 मतदारांपैकी 90 टक्क्यांहून अधिक मतदारांना मतमोजणी पत्रे मिळाली आहेत. ज्यांची संख्या 7,16,04102 आहे, तर 90.37 टक्के म्हणजेच 7,13,65,460 पुनरीक्षण अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले आहेत.

संतत्व म्हणजे मातृत्व आणि हेच समाजाला जोडून ठेवतात, ‘महाराष्ट्र वारकरी किर्तनकार गोलमेज परिषदे’त किर्तनकार व तज्ज्ञांचा सूर 

फक्त 2.70 टक्के लोकांचे अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत. एकूण 97.30 टक्के मतदारांना एसआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आला असल्याची माहिती देखील आयोगाकडून देण्यात आली आहे.

follow us