Republic Day : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. खरंतर भारत आणि फ्रान्सचे संबंध प्रस्थापित करण्यात तत्कालीन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जैक्स शिराक (President Jacques Chirac) यांची महत्वाची भूमिका आहे. जेव्हा कोणीही भारताची संबंध प्रस्थापित करत नव्हतं, तेव्हा शिराक यांनी भारताला साथ दिली आणि भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला.
Manoj Jarange : आझाद मैदानात घुमणार मराठ्यांचा ‘आव्वाज’; रोहित पवारही मदतीसाठी सरसावले
शिराक हे फ्रान्सचे दोनदा पंतप्रधान, दोनदा राष्ट्राध्यक्ष आणि जवळपास 18 वर्षे राजधानी पॅरिसचे महापौर होते. युरोपमध्ये असे फार थोडे नेते आहेत ज्यांची राजकीय कारकीर्द इतकी मोठी आहे.
गेल्या वर्षी ‘भारत-फ्रान्स’ यांच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे दोन्ही देशाला प्रचंड आनंद झाला.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे’ सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं. मात्र, भारत आणि फ्रान्स यांच्यातील त्या ‘रणनीती भागीदारीचा’ पाया 1998 साली रचला गेला, जेव्हा जैक्स शिराक हे भारत भेटीवर आले होते. शिराक 1995 ते 2007 दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष होते. 1998 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांना निमंत्रित केलं होतं. याआधीही 1976 मध्ये ते भारतात आले होते. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांतही ते 2006 मध्ये भारतात आले, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी दिल्ली हैदराबाद हाऊसमध्ये भेट झाली होती आणि भारत-फ्रान्स संबंधांचा नवा अध्याय लिहिला. मात्र, त्याआधी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिराक यांनी भारताच्या बाजूने घेतलेली भूमिका विसरता येणार नाही.
कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरूवात, अभिनेता आयुष्मान खुरानाही हजर
शिराक हे भारताचे मित्र – मोदी
26 सप्टेंबर 2019 रोजी दीर्घ आजारानंतर शिराक यांचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. या ट्वीटमध्ये मोदींना शिराक यांना ‘भारताचे मित्र आणि जगाचे खरे राजकारणी’ म्हटले होते. मोदींनी लिहिले की, भारताचा मित्र या नात्याने त्यांनी भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्यात आणि वाढविण्यात निर्णायक भूमिका बजावली.
पोखरण-II दरम्यान भारताला पाठिंबा
मे 1998 मध्ये, अटल बिहारींच्या नेतृत्वाखालील सरकारने यशस्वी अणुस्फोटानंतर भारताला अणु क्षमता असलेला देश म्हणून घोषित केले, तेव्हा जगाच्या विविध भागातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. जगातील महत्त्वाच्या आणि शक्तिशाली देशांनी या कामगिरीबद्दल भारतावर टीका केली. विशेषत: अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन इत्यादी मुक्त-विचार मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथाकथित उदारमतवादी आणि शक्तिशाली देशांनी भारताविरुद्ध केवळ कठोर विधानेच केली नाहीत तर अनेक निर्बंधही लादले होते. पण फ्रान्सने भारतावर टीका केली नाही. शिराक हे या शक्तिशाली देशांच्या मताशी सहमत नव्हते. त्यांना या चाचण्यांसाठी भारताचे कौतूक केलं आणि भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
अमेरिकेने केलेला हल्ला योग्य नाही
2003 मध्ये इराक युद्धादरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे चिराकची सर्वात बोलकी ओळख. शिराक यांनी इराकवर अमेरिकेने केलेला हल्ला योग्य मानला नाही आणि त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांच्या सरकारशी फ्रान्सचे संबंध बिघडले.
ज्यूंची माफी मागितली
दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मन डेथ कॅम्पमध्ये पाठवलेल्या सुमारे ७६ हजार ज्यूंना आणि निरपराध लोकांवर झालेल्या सर्व अत्याचारांना फ्रान्सही जबाबदार होता, असे शिराक यांनी मान्य केले. नाझींनी केलेल्या गुन्हेगारी कृत्यांना फ्रेंच लोक आणि त्यावेळच्या सरकारचे समर्थन होते असे शिराक नेहमी म्हणत. दुस-या महायुद्धानंतर प्रथमच फ्रेंच राष्ट्रप्रमुखाने या जघन्य गुन्ह्यासाठी माफीही मागितली.
सर्वात आवडते राजकारणी की लबाड नेतृत्व ?
शिराक यांच्यावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की ते जागतिक मुद्द्यांवर ठामपणे उभे असल्याचे दिसत असले तरी ते देशाच्या अंतर्गत परिस्थितीत लक्षणीय सुधारणा करू शकलेले नाहीत. जे लोक या मताशी सहमत आहेत, ते म्हणतात की 2007 मध्ये जेव्हा शिकार यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला तेव्हा फ्रान्सवर कर्ज होते. बेरोजगारी वाढली होती. तर काही जणांसाठी शिराक हे आवडते राजकारणी आहेत.
शिराकची खिल्ली उडवणारे आणि त्यांना टोमणे मारणारेही त्यांना मोठा लबाड म्हणत. याचे कारण फ्रान्सचे अंतर्गत राजकारण होते. राजधानी पॅरिसचे महापौर असताना शिराक यांनी पक्षाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप होता