CM Devendra Fadanvis and Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी ते बोलताना म्हणाले की, संविधान विकासाचा अन् समतेचा मार्ग दाखवत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोस्टल रोडचं उत्तरवाहिनी कनेक्टरसह तीन कनेक्टरचं लोकार्पण त्यांनी केलंय. या उद्घाटनानंतर 94 टक्के या रस्त्याचं काम (76th Republic Day) पूर्ण होईल.
केवळ प्रभादेवी कनेक्टर शिल्लक असल्याचं फडणविसांनी सांगितली. उद्या सकाळपासून हा रस्ता (Coastal Road) मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची घोषणा देखील यावेळी फडणविसांनी केलीय. या रस्त्यामुळे वेळेची, इंधनाची मोठी बचत होणार आहे. महायुती सरकारच्या वतीनं मुंबईकरांसाठी हा रस्ता प्रजासत्ताकदिनी खुला करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, ICU तून हलवलं अन् रूग्णानं सोडला जीव…
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते स्थगिती सरकार होतं. हे शिघ्रगती सरकार आहे. या रस्त्याचं काम दुसऱ्या महायुती सरकारच्या काळात झालाय. त्यामुळं विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, मुंबईकरांनी सर्व पाहिलेलं आहे. उद्या उठून कोणी असे म्हणेल की, ताजमहाल आम्ही बांधलाय, अशी टीका त्यांनी केलीय. पालकमंत्रिपदाचा कोणताच वाद नसल्याचं देखील फडणविसांनी यावेळी स्पष्ट केलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. आजच्या दिवसाचं कोस्टल रोड हे गिफ्ट असल्याचं ते म्हणालेत. आपण सी-लिंक ते वरळी मरीन ड्राईव्ह दहा ते बारा मिनिटांत जाणार. युतीमध्ये असताना देखील भूमिपुजनाला देवेंद्रदजींना बोलवलं नव्हतं. क्रेडिट घेताना काम करावं लागतं. रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं. त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो, असा घणाघात शिंदेंनी ठाकरेंवर केलाय.
‘संविधान हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आधार’; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महायुती सरकारने मुंबईकरांच्या जीवनात आनंद देण्याचं काम केलंय. हा रस्ता वरून पाहिल्यास परदेशात आल्यासारखं वाटतंय. अशा प्रकारच्या ब्रिज मुंबईत होतोय, ही मुंबईकरांसाठी गौरवाची बाब आहे. आज प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केलाय. सरकार बदललं असतं, तर हे काहीच दिसलं नसतं. खोडा घालणाऱ्या लोकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला त्यांनी लगावलाय.