Download App

मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर! 9 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमध्ये वर्षभरात चौथा बळी

9 Year Old Girl Dies Of Amoebic Encephalitis : केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस (Amoebic Encephalitis) या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नाकावाटे शरीरात शिरलेल्या अमीबामुळे तिच्या मेंदूत झपाट्याने संसर्ग पसरला आणि उपचारादरम्यानच तिचा (Health Tips) दुर्दैवी अंत झाला.

आजाराची सुरुवात

13 ऑगस्ट 2025 रोजी मुलीला ताप आल्याने तिच्या पालकांनी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. परंतु स्थिती झपाट्याने गंभीर झाल्याने दुसऱ्याच दिवशी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही 14 ऑगस्ट रोजीच तिचा मृत्यू झाला. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस हा मृत्यूचा कारणीभूत आजार असल्याचं 15 ऑगस्ट रोजी स्पष्ट झालं.

एल्विश यादव हिटलिस्टवर! भाऊ गँगने घेतली गोळीबाराची जबाबदारी, धक्कादायक खुलासा…

अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?

आरोग्य विभागानुसार, हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या मुक्त-जिवंत अमीबामुळे होतो. हा सूक्ष्मजीव दूषित गोड्या पाण्यात — जसं की तलाव, विहिरी, नद्या, गरम पाण्याचे झरे किंवा क्लोरीन न घातलेलं पाणी यामध्ये आढळतो. पोहणे, डुबकी मारणे किंवा दूषित पाण्यात अंघोळ करताना तो नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. एकदा शरीरात शिरल्यानंतर हा अमीबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तेथील पेशींवर हल्ला करतो. परिणामी मेंदूच्या पेशी नष्ट होत जातात आणि संसर्ग झपाट्याने पसरतो.

कोणती लक्षणे दिसतात?

हा आजार सुरुवातीला सामान्य तापासारखा वाटतो, पण काही तासांतच गंभीर रुप धारण करतो. तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटी, मान ताठर होणे, वास आणि चव यामध्ये बदल, गोंधळ, संतुलन बिघडणे, दौरे, काही प्रकरणांमध्ये कोमामध्ये जाणं. लक्षणं सुरू झाल्यानंतर साधारणतः 5 ते 18 दिवसांत मृत्यू होऊ शकतो.

बिहार निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला; 50 टक्के आरक्षणावर मोठं भाकीत

तज्ज्ञ काय म्हणतात?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की, संक्रमण इतक्या वेगाने पसरतं की तातडीने निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाला वाचवणं अवघड होतं. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. हा आजार दुर्मिळ आहे, पण एकदा झाला तर जीवघेणा ठरतो. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणं आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं हाच एकमेव उपाय आहे.”

केरळमधील वाढती प्रकरणं

कोझिकोड जिल्ह्यातील ही घटना गेल्या वर्षभरातील चौथी ठरली आहे.

मे 2024 : 5 वर्षीय मुलगी मृत्यूमुखी
जून 2024 : 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
जुलै 2024 : 14 वर्षीय मुलगा मृत्यूमुखी
ऑगस्ट 2025 : 9 वर्षीय मुलगी मृत्यूमुखी

या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमीबिक इंसेफेलायटिस हा जगातील अत्यंत दुर्मिळ पण जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यूदर असलेला आजार मानला जातो. अगदी तातडीने उपचार केले तरी केवळ मोजकेच रुग्ण यातून वाचतात.

आरोग्य विभागाची पावले

– तलाव, विहिरी आणि जलस्रोतांची तपासणी सुरू
– दूषित पाण्यात अंघोळ, पोहणं किंवा डुबक्या मारणं टाळण्याचं आवाहन
– स्वच्छता आणि पाण्याच्या स्त्रोतांची सुरक्षितता याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश

 

follow us